प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी व संस्कृती जपली पाहिजे – आशुतोष काळे दहीहंडी उत्सवाला कोपरगावच्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगावसह कोल्हापूर, सांगली व सातारा येथे महापुरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची उदार अंतकरणाच्या कोपरगावकरांनी सामाजिक बंधिलकीतुन मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. कोपरगावचे नागरिक संकटकाळी पुढे येतात ही अभिमानाची गोष्ट आहे. दहीहंडी उत्सवासाठी विविध मंडळाचे गोविंदा पथक या एका दिवसासाठी वर्षभर मेहनत करीत असतात.आपली संस्कृती जपली जावी व गोविंदा पथकांनी केलेल्या आग्रहास्तव दहीहंडी उत्सव आयोजित केला असल्याचे सांगत आपण ज्याप्रमाणे सामजिक बांधिलकी जोपासतो त्याप्रमाणे आपण आपली संस्कृतीही जोपासली पाहिजे असे प्रतिपादन आशुतोष काळे यांनी आयोजित दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रम प्रसंगी केले. कोपरगाव शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी आशुतोष काळे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला कोपरगावच्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक गोविंदा पथकांनी उंचच्या उंच थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु एकाही गोविंदा पथकाला हि दहीहंडी फोडण्यात यश आले नाही. शेवटी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राकेश माणगावकर यांच्या हस्ते व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत ही मानाची दहीहंडी फोडण्यात आली. आशुतोष काळे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला कोपरगावच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हा दहीहंडी उत्सव बिग बॉस फेम व सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात महापुरामुळे व कोपरगाव शहरात डेंग्यूमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना तसेच माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये कोपरगावसह, कोल्हापूर, सांगली व सातारा येथे पूरपरिस्थितीमध्ये मदत करणाऱ्या सर्व कोपरगावकरांचा व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा आशुतोष काळे, तहसीलदार योगेश चंद्रे व अभिनेत्री रेशम टिपणीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या दहीहंडी उत्सवामध्ये ढोल ताशांच्या गजरात कार्यक्रमस्थळी गोविंदा पथक येत होते. आशुतोष काळे मित्र मंडळ, धर्म योद्धा शामभाऊ चव्हाण मित्रमंडळ, जय जगदंबा मित्रमंडळ, मोहनीराज नगर मित्रमंडळ, टायगर पॉइंट मित्रमंडळ, जय बजरंग मित्रमंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मित्रमंडळ सोनार वस्ती, हनुमान नगर मित्रमंडळ, आर्यन ग्रुप मित्र मंडळ आदी गोविंदा पथकांनी भाग घेतला. सर्वच गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी चार थरापर्यंत प्रयत्न केला पण त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. यावेळी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस म्हणाल्या की, कोपरगाव शहरासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे संसार पुन्हा उभे राहावे यासाठी आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये दिले. एकीकडे पूरग्रस्तांना मदत व दुसरीकडे संस्कृती जपण्यासाठी आयोजित केलेला हा दहीहंडी उत्सव सामाजिक बांधिलकी व संस्कृती जपण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद असून या दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदा पथकांचा व कोपरगावच्या नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह व अलोट गर्दी पाहून मी कोपरगावमध्ये नसून मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे असे जाणवत असल्याचे गौरवद्गार काढले.यावेळी आशुतोष काळे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, आजी - माजी नगरसेवक, कार्यकर्ते, गोविंदा पथके व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram