साठवण तलाव ४ व ५ च्या बाबतीत आज न्यायालयात सुनावणी- आशुतोष काळे

कोपरगावच्या नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून कोपरगाव नगरपरिषदेला वारंवार निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे ४ व ५ नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरु करावे यासाठी उच्च न्यायालयात सुनील गंगुले,संदीप वर्पे, मंदार पहाडे यांच्या नावे दाखल करण्यात जनहित याचिकेची आज सोमवार (दि.) २६/८/१९ सुनावणी होणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, कोपरगावच्या नागरिकांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी आणला होता. परंतु हा निधी परत गेल्यामुळे पाणी प्रश्न रेंगाळलेला होता. यासाठी मी कार्यकर्त्यांसमवेत अनेक वेळा आंदोलन करून, प्रशासकीय अधिकारी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिली. आमरण उपोषण व धरणे आंदोलन प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेने ४ व ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्याबाबत लेखी आश्वासनही दिले होते. परंतु कोपरगाव नगरपरिषदेकडून साठवण तलावाचे काम सुरु करण्याबाबत सुरु असलेली चालढकल कोपरगावच्या नागरिकांना न परवडणारी होती. त्यामुळे तातडीने निर्णय घेवून ४ व ५ नंबर साठवण तलावाचे काम कोपरगाव नगरपरिषदेणे तातडीने सुरु करावे यासाठी कोपरगावच्या नागरिकांसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. सदरयाचिकेत महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या जनहित याचिकेची नियमितपणे सुनावणी सुरु आहे. परंतु कोपरगाव नगर परिषद, प्रांताधिकारी,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हाधिकारी व शासनाकडून २३ जुलै २०१९ रोजी ४ व ५ नंबर साठवण तलावाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची माहिती सादर करण्यात आलेली नाही. किमान आज तरी सुनावणीच्या वेळी कोपरगाव नगरपरिषदेणे न्यायालयात उपस्थित राहून न्यायालयापुढे साठवण तलाव करणार की नाही हे स्पष्ट केले पाहिजे अशी सर्वसामान्य कोपरगावच्या नागरिकांची अपेक्षा असल्याचे आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram