महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत द्या- आशुतोष काळे

नाशिक धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे रविवार (दि.४) पासून नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात केला जाणारा पाण्याचा विसर्ग ८० हजार क्युसेस वरून ३ लाख क्युसेस पर्यंत गेला. त्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला होता. या महापुरामुळे गोदावरी नदीच्या काठावरील शेतकऱ्यांचे, कोपरगाव शहरात पाणी शिरल्यामुळे व्यावसायिकांचे व नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून पूरग्रस्त बाधित शेतकरी,व्यावसायीक व नागरिकांना तातडीने मदत द्या अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. दिलेल्या निवेदनात आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा देण्यात आलेला ईशारा व नदीपात्र सोडून वाहत असलेल्या गोदावरी नदीचे रौद्ररूप पाहून गोदाकाठ परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आपत्कालीन यंत्रणेच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. मात्र महापुराच्या पाण्यामुळे गोदाकाठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. गोदावरी नदीच्या काठावर असलेली हजारो एकर शेती उध्वस्त झाली आहे.हजारो एकर शेती महापुराच्या पाण्याने बाधित झाली असून सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.गोदावरी नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे नदीकाठच्या जमिनी उभ्या पिकासकट वाहून गेल्या आहेत. महापुराच्या पाण्याने ही पिके उन्मळून पडली आहेत तर शेतात पाणी साचून राहिल्याने असलेली पिके सडून जाणर आहे.शेतकऱ्यांनी साचवलेल्या कांद्याच्या चाळीत महापुराचे पाणी गेल्यामुळे या शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आलेल्या महापुरामुळे गोदावरी नदीच्या काठावरील शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. कोपरगाव शहरात महापुराचे पाणी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानात शिरल्यामुळे तसेच नागरिकांच्या घरात हे पाणी जाऊन त्यांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील वडगाव, चास, मोर्विस, मंजूर, मायगाव देवी, वेळापूर, सुरेगाव, माहेगाव देशमुख, कुंभारी, हिंगणी, डाऊच तसेच राहाता तालुक्यातील शिंगवे, वारी, पुणतांबा आदी गोदावरी काठच्या गावातील शेतकऱ्यांना व कोपरगाव शहरातील नागरिकांना व व्यावसायिकांना या महापुराचा मोठा तडाखा बसला आहे. आपण या महापुराने बाधित झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतक-यांना आणि महापुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या व्यावसायिकांना व नागरिकांना तातडीने शासकीय मदत मिळवून द्यावी असे दिलेल्या निवेदनात आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram