एस. टी. प्रवाशांची गैरसोय टाळा - आशुतोष काळे

कोपरगाव बस स्थानकाचे पर्यायी व्यवस्था केलेल्या बस स्थानकाच्या ठिकाणी प्रवाशांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. कोपरगाव आगार प्रमुखांनी याकडे लक्ष घालून एस. टी. प्रवाशांची होत असलेली गैरसोय टाळून एस.टी. प्रवाशांना चांगल्या सुविधा द्याव्यात अशा सुचना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी कोपरगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख अभिजित चौधरी यांना केल्या. कोपरगाव आगारातून सुटणाऱ्या ग्रामीण भागातील विविध गावांच्या ठिकाणी कोपरगाव आगाराच्या बस थांबत नाही. त्यामुळे एस. टी. ची वाट पाहत बसलेल्या विद्यार्थ्याना, प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संजीवनी, संवत्सर शाळा, करंजी, हंडेवाडी, मढी फाटा आदी ठिकाणी बस बाबत असंख्य नागरिकांच्या तक्रारी असून या तक्रारी तातडीने दूर कराव्या. कोपरगाव – धामोरी मार्गे हंडेवाडी येथे मुक्कामी असणारी हंडेवाडी येथे मुक्कामी थांबत नाही. या बसच्या भरवशावर असलेल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. तसेच कोपरगावच्या पर्यायी बस स्थानकाच्या ठिकाणी प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून बस मध्ये बसावे लागते. बस स्थानकाच्या ठिकाणी सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असल्यामुळे प्रवाशांना पायी चालणे अवघड होवून बसले आहे. एस. टी. ने प्रवास करणाऱ्यामध्ये महिला, अपंग व जेष्ठ नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे जेष्ठ नागरिकांना बस स्थानकाच्या गैरसोयीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेवून तातडीने उपाय योजना कराव्या. याच बरोबर चालक व वाहक यांनाही शाळा महाविद्यालयाच्या झालेल्या तक्रारीची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्यावी. जवळपास सर्वच चालक वाहकांचे काम अतिशय चांगले असून काही दोन चार कर्मचारी प्रवाशांशी चुकीचे वर्तन करीत असतील तर ही खेदाची गोष्ट आहे. याबाबत सर्वच चालक वाहकांनी प्रवाशांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी योग्य प्रयत्न करावे अशा सुचना आशुतोष काळे यांनी आगार प्रमुख अभिजित चौधरी यांच्याशी चर्चा करतांना दिल्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram