सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेमध्ये गौतम पब्लिक स्कूल विजयी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्हा स्तरीय १४ व १७ वर्ष वयोगटातील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते दि. २० जुलै २०१९ रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या प्रांगणात करण्यात आले. पार पडले. या स्पर्धा गौतम पब्लिक स्कूल मध्ये दि. २० ते २३ जुलै २०१९ दरम्यान पार पडल्या.सदर स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात अहमदनगर जिल्हयातील ३० संघांनी व १४ वर्ष वयोगटात २० संघांनी सहभाग घेतला होता. सदरच्या स्पर्धा अतिशय चुरशीच्या झाल्या. १७ वर्ष वयोगटामध्ये गौतम पब्लिक स्कूलचा फुटबॉल संघ उपविजयी ठरला व १४ वर्ष वयोगटात गौतम पब्लिक स्कूलच्या फुटबॉल संघाने सेमी फायनल मध्ये रामराव आदिक पब्लिक स्कूल संघाचा सडन डेथ मध्ये १-० ने पराभव केला व अंतिम सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूल संघाचा १-० गोल फरकाने पराभव केला. गौतम पब्लिक स्कूलचा संघ दि. ४ ऑगस्ट २०१९ पासून गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर सुरु होणा-या विभागीय स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हयाचे नेतृत्व करणार असल्याचे माहीती प्राचार्य नूर शेख यांनी दिली. सदर स्पर्धेमध्ये गौतमच्या विजयी संघातील सुयोग कातोरे (कर्णधार), रोहीत ठाकूर, प्रतिक भागवत, ओम गडाख, सागर चोंडगीर, प्रतिक षिरसाठ (उपकर्णधार/गोल किपर), अभिषेक ढाकणे, धनराज आमराळे, राजवर्धन पाटील, कल्पेष माळी व भूषण तासकर या खेळाडूंनी विजयश्री खेचून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली. सदरच्या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा संचालक व फुटबॉल प्रशिक्षक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेष पटारे, बास्केटबॉल प्रशिक्षक संजय इटकर,कपिल वाघ, रिजवान पठाण व हाऊस मास्टर्स यांनी परीश्रम घेतले.या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, व्हा. चेअरमन छबुरावजी आव्हाड, विश्वस्त आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. कविता निंबाळकर क्रीडा प्रशिक्षक विशाल गर्जे, सर्व सदस्य, प्राचार्य, प्रशिक्षक यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक करुन विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram