गुरुपौर्णिमेनिमित्त आशुतोष काळेंनी केले संतगुरुपूजन

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील जंगली महाराज आश्रम कोकमठाण, श्री. संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम, श्री. साईबाबा तपोभूमी मंदिर कोपरगाव येथे जावून संतगुरुपूजन करून आशीर्वाद घेतले. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु पौर्णिमा गुरुला आदर आणि समर्पण करण्याचा उत्सव असून गुरु शिष्याचे महत्त्व अधोरेखित करणारा गुरु पोर्णिमा उत्सव कोपरगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. काळे परिवाराची संत, महात्मा व गुरु यांच्याप्रती असलेली आदरभावनेची परंपरा पुढे सुरु ठेवत कोपरगाव तालुक्यातील साजऱ्या होत असलेल्या गुरुपोर्णिमा उत्सवाच्या ठिकाणी उपस्थित राहून संत महात्म्यांचे मनोभावे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतेले. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रम येथे प.पु. जंगलीदास माऊली, कोपरगाव बेट भागातील श्री. संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे प.पु.रमेशगिरीजी महाराज, तसेच प.पु. माधवगिरीजी महाराज यांचे पूजन केले. तसेच साईबाबा तपोभूमी येथे आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते साईबाबांच्या प्रतिमेचे व चरणपादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या हस्ते धूप आरती करण्यात आली. यावेळी साई पालखी काढण्यात आली व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार अशोकराव काळे तसेच साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram