पाच नंबर साठवण तलावाच्या कामास लवकरच सुरुवात होणार ! नऊ दिवसाच्या आंदोलनाचे चीज,धरणे आंदोलन मागे- आशुतोष काळे

कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ४ नंबर साठवण तलावाचे अंदाजपत्रक कोपरगाव नगरपरिषदेणे तांत्रिक मंजुरीसाठी दिनांक ३/६/२०१९ रोजी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, संगमनेर यांच्याकडे पाठविले आहे. तसेच तसेच साठवण तलाव क्र. ५ चा आराखडा कोपरगाव नगरपरिषदेणे तयार करून गायत्री प्रोजेक्ट्स, हैदराबाद या कंपनीला दिनांक ४/६/२०१९ रोजी दिला आहे. साठवण तलाव क्रमांक ४ चे काम पुन्हा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून सुधारित अंदाजपत्रक तयार करून शासनाकडून निधी मागणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही सुरु आहे. असे लेखी पत्र कोपरगाव तहसीलदार योगेश चंद्रे व कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी धरणे आंदोलनस्थळी येवून आशुतोष काळे यांना दिले. त्यामुळे गायत्री कंस्ट्रक्शन कंपनीवर असलेल्या राजकीय दबावापोटी या कंपनीने साठवण तलावाचे काम सुरु करण्याबाबत दाखविलेली असमर्थता व कोपरगाव नगरपरिषदेणे ४ नंबर व ५ नंबर साठवण तलावाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार न केल्याच्या निषेधार्थ सोमवार दि.२७/५/२०१९पासून सुरु केलेले धरणे आंदोलन (दि.४) रोजी मागे घेण्यात आल्याची माहिती आशुतोष काळे यांनी दिली आहे. जनतेच्या प्रश्नासाठी राजकरण बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे हा माझा मुख्य उद्देश आहे. कोपरगाव शहर व तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आजपर्यंत प्रमाणिक प्रयत्न केले असून यापुढेही नेहमीच माझे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे आशुतोष काळे यांनी ठामपणे सांगितले. सोमवार दिनांक ३/६/२०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व गायत्री कन्स्ट्रक्शनचे उपाध्यक्ष रेड्डी यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक होऊन या बैठकीमध्ये नवीन साठवण तलाव क्र.५चे काम करण्यास तयार असून कोपरगाव नगरपरिषदेने साठवण तलाव क्र. ५ चा आराखडा तयार करून असे गायत्री कन्स्ट्रक्शनचे उपाध्यक्ष रेड्डी यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना सांगितले. त्यामुळे पाच नंबर साठवण तलावाच्या कामाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडण्याचे आंदोलन स्थगित करून मात्र धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे धरणे आंदोलनच्या ९ व्या दिवशी (दि.४) रोजी धरणे आंदोलन सुरूच होते. (दि.४) रोजी तहसीलदार योगेश चंद्रे व कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आंदोलन स्थळी येवून त्याबाबत सविस्तर चर्चा करून लेखी पत्र आशुतोष काळे यांना दिले.त्यावेळी कोपरगावच्या व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांनी आशुतोष काळे यांना पेढे भरवून आपला आनंद व्यक्त केला. प्रशासनाने दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे. जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हे काम पूर्ण करून घेण्यासाठी माझा व्यक्तिगत पाठपुरावा सुरूच राहील. परंतु दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कार्यवाही करावी दिरंगाई झाल्यास यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा ईशाराही आशुतोष काळे यांनी यावेळी दिला. यावेळी पद्माकांत कुदळे, नगरसेवक संदीप वर्पे, सुनील गंगुले, विजयराव आढाव, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, राजेंद्र वाघचौरे, हिरामण गंगुले, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, धरमशेठ बागरेचा, नवाज कुरेशी, फकीर मामू कुरेशी, संतोष चवंडके, रमेश गवळी, संदीप सावतडकर,दिनार कुदळे, गोरक्षनाथ जामदार, चारुदत्त सिनगर, मेहबूब शेख,निखील डांगे, दिनकर खरे, मुकुंद भुतडा, निलेश उदावंत, रावसाहेब साठे, आदर्श पठारे, नारायण गाडे, बाळासाहेब रुईकर, बापू वढणे, बाला गंगुले, वाल्मिक लाहीरे, निखील डांगे, स्वप्नील पवार, सतीश शिंदे, अनिस शेख, धनजय कहार, विजय नागरे, संदीप कपिले, विक्की जोशी, महेश उदावंत, नितीन साबळे, रोहित साळुंके, प्रकाश दुशिंग, बाळासाहेब सोनटक्के, चंद्रशेखर म्हस्के, राहुल देवळालीकर, सचिन परदेशी, अरुण चंद्रे, राजेंद्र फुलपगर, नारायण गोरडे,गणेश बुरुडे आदी मान्यवरांसह कोपरगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram