साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरु राहणार- आशुतोष काळे

कोपरगाव शहरातील चार नंबर व पाच नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरु करण्याबाबत आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली दुसर्‍या दिवशीही धरणे आंदोलन सुरूच राहिल्यामुळे या आंदोलनाची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दखल घेत आशुतोष काळे यांना चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आशुतोष काळे, कोपरगावचे आमदार, नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय काळे व गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर तात्याराव डुंगा यांच्या समवेत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पाच नंबर साठवण तलावाचे काम गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी का करू शकत नाही याबद्दल प्रोजेक्ट मॅनेजर तात्याराव डुंगा यांच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना साठवण तलाव क्र. पाच ते समृद्धी महामार्गाचे सुरु असलेले कामाच्या ठिकाणापर्यंत वाहतुकीसाठी जास्त अंतर असल्याचे व माती, मुरूम यांची गुणवत्ता कमी असून त्यामुळे अतिरिक्त खर्च वाढणारअसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी असे सांगितले की, वर्धा येथे सुरु असलेले समृद्धी महामार्गाच्या कामाचा ठेकेदार १०० किलोमीटर वरून, तर काही ठिकाणी ठेकेदार ३० किलोमीटर तर इतर ठिकाणी समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेले ठेकेदार जवळपास ५० किलोमीटर वरून दगड, माती, मुरूम यांची वाहतूक करीत आहे. साठवण तलाव क्रमांक पाच ते समृद्धी महामार्गाचे सुरु असलेले कामापर्यंतचे अंतर केवळ सहा किलोमीटर असतांना का तुम्हाला का परवडत नाही? असा प्रश्न विचारला असता त्या प्रश्नावर प्रोजेक्ट मॅनेजर तात्याराव डुंगा निरुत्तर झाले. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या समवेत कोपरगाव तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत मातीचा दर्जा चांगला नसल्याचे सांगणारे प्रोजेक्ट मॅनेजर तात्याराव डुंगा यांनी जिल्हाधिकाऱ्याना माती वापरण्या योग्य असल्याची कबुली दिल्यामुळे एकप्रकारे जिल्हाधिकाऱ्यांकडू गायत्री कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदाराची पोलखोल झाली आहे. तसेच आशुतोष काळे यांनी सातत्याने पाच नंबर साठवण तलावाचे कामाचा प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवावा अशी वारंवार मागणी केलेली आहे. त्या आशयाचा ठरावही सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. परंतु नगरपालिका प्रशासनाने तो प्रस्ताव आजपर्यंत तयार केलेला नाही. असे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले असता मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आचार संहितेची अडचण असल्याचे सांगितले.यावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी विकास कामांचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यास आचारसंहितेची कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट करीत कोपरगाव नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचेही पितळ उघडे पाडले असून चार व अपच नंबर साठवण तलावाचे कामाचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र जोपर्यंत पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्या बाबत प्रशासनाकडून जोपर्यंत गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीला आदेश देत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. आज धरणे आंदोलनाला माजी आमदार अशोकराव काळे यांनी उपस्थिती लावली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, विजयराव आढाव, संतोष चवंडके, दिनार कुदळे, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, कृष्णा आढाव, चारुदत्त सिनगर, गोरक्षनाथ जामदार आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram