कोपरगावच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरची लढाई लढणार – आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीकडून दगड, मुरूम व माती समृद्धी महामार्गासाठी घेऊन जाण्याच्या अटीवर पाच नंबर साठवण तलावाचे काम करण्याची तयारी दर्शविली होती. अशी माहिती वृत्तपत्रातूनही प्रसिद्ध करण्यात आली होती.पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु झाल्यास नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार होती परंतु मागील काही दिवसांपासून याच गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीने साठवण तलावाचे काम करण्यास असमर्थता दाखविल्यामुळे साठवण तलावाच्या कामाचे घोंगडे भिजत पडले असून गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीला तातडीने साठवण तलावाचे काम सुरु करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिलेल्या पत्रामध्ये केली आहे.कोपरगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत असून आता न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाईही लढणार असल्याचा ईशारा आशुतोष काळेंनी दिला आहे. दिलेल्या पत्रामध्ये पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारऱ्या चार साठवण तलावांची साठवण क्षमता कमी असल्यामुळे भविष्यात हे साठवण तलाव नागरिकांची तहान भागवू शकत नाही या गोष्टीची जाणीव असलेले माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात चार नंबर साठवण तलावाच्या विस्तारीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी आणला होता. परंतु कोपरगाव नगरपरिषदेने हा निधी साठवण तलाव क्र. ४ च्या कामासाठी खर्च न केल्यामुळे शासनाने हा निधी परत घेतला त्यामुळे चार नंबर साठवण तलावाच्या विस्तारीकरणाचे काम आजही रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकांना कधी २४ तर कधी १० ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. या चारही साठवण तलावात गाळ साचल्यामुळे त्याचाही परिणाम साठवण क्षमतेवर झाला असून या साठवण तलावातून समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून गाळ काढण्यात आला. त्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत सलग नऊ दिवस पोकलँड मशिन गाळ काढण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. कोपरगाव शहराच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकसंख्येचा विचार करता कोपरगाव शहरासाठी आणखी एका साठवण तलावाची नितांत गरज असल्यामुळे पाच नंबर साठवण तलावाचे काम व्हावे यासाठी मी कोपरगाव नगरपरिषदेकडे वारंवार मागणी केलेली आहे. कोपरगाव शहराला आवश्यक असणारा पाणीसाठा मंजूर असतांना देखील केवळ साठवण क्षमता नसल्यामुळेच नागरिकांना मोठ्या पाणी टंचाईला आजपर्यंत सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या पिण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी मागील चार वर्षापासून चार नंबर साठवण तलावाच्या विस्तारीकरण कामासाठी व पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने वेळोवेळी आंदोलने व उपोषण देखील केलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार भेटून लेखी स्वरूपात निवेदन देवूनही आजपर्यंत चार नंबर साठवण तलावाचे काम सुरु होऊ शकले नाही त्यामुळे कोपरगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयात जावे लागले आहे. साठवण तलावाचे काम सुरु करण्यास हि कंपनी टाळाटाळ करीत आहे. वास्तविक पाहता साठवण तलावाच्या माध्यमातून या कंपनीचा वेळ आणि खर्च देखील वाचणार आहे त्याच बरोबर साठवण तलावाचे कामही शीघ्रगतीने होऊन पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. त्यासाठी आपण गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीला तातडीने पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्याचे आदेश द्यावेत. २६ मे २०१९ पर्यंत जर प्रशासनाकडून या कंपनीला साठवण तलावाचे काम सुरु करण्याचे आदेश न झाल्यास मी कोपरगाव शहरातील तमाम नागरिकांच्या समवेत कोपरगाव तहसील कार्यालयासमोर सोमवार दिनांक २७/५/२०१९ पासून धरणे आंदोलन करणार असा ईशारा आशुतोष काळे यांनी दिलेल्या पत्रात प्रशासनाला दिला आहे. त्यासंबंधीचे पत्र प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व कोपरगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram