गौतम सहकारी बँकेला ५८ लाख नफा, रिजर्व बँकेच्या संमतीने लाभांशही देणार-आशुतोष काळे.

कोपरगाव तालुक्यातील उद्योजक, व्यापारी, कामगार व शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागविणाऱ्या व सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेला नुकत्याच संपलेल्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ५८ लाख रुपये करपूर्व नफा झाला असून भारतीय रिजर्व बँकेने सभासदांना लाभांश देण्याची परवानगी दिल्यास सभासदांना लाभांशही देणार असल्याची माहिती युवा नेते आशुतोष काळे यांनी दिली आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी कोसाका उद्योग समुहाची उभारणी करून सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्याचवेळी कारखाना उद्योग समुहाचे कर्मचा-यांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी व परिसरातील छोट्या-मोठ्या उद्योजकांना व्यवसायासाठी तातडीने कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी गौतम सहकारी बँकेची स्थापना केली. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या अतूट विश्वासावर गौतम सहकारी बँकेने अल्पावधीतच विश्वसनीय संस्था म्हणून नावलौकिक मिळविला होता. परंतु काही वर्षापूर्वी कर्जवसुली व सरकारच्या चुकीचे धोरणामुळे बँकेला ४ कोटी ७९ लाख रुपयांचा तोटा झाला होता. त्यावेळी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या काटकसरीच्या धोरणातून व बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चार वर्षात २००९ साली तोट्यात गेलेली बँक मागील वर्षात संपूर्णपणे तोटामुक्त केली तसेच मावळत्या आर्थिक वर्षात बँकेने ३५ लाख रुपये आयकर भरून राष्ट्रीय कार्यास मोठा हातभार लावला आहे. आज रोजी बँकेचे नेट एन.पी.ए.चे प्रमाण ४% पेक्षा खाली आले आहे. बँकेने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३०२ खात्यांवर २२.२९ कोटींचा संमिश्र व्यवसाय केला आहे. कर्जवाटपामध्ये रुपये १४.५६ कोटींची वृद्धी झालेली असून ठेवी मध्ये रुपये ९.६० कोटीची वाढ झालेली आहे. बँकेचे वसूल भाग भांडवल ४ कोटी ५९ लाख, राखीव निधी ७ कोटी ५८ लाख ८१ हजार, ठेवी ८७ कोटी ११ लाख ४५ हजार, कर्जवाटप ५४ कोटी ६२ लाख ९२ हजार व गुंतवणूक ३८ कोटी ५१ लाख ९३ हजार करून ५८ लाख ४४ हजार रुपये निव्वळ नफा झालेला आहे. गौतम सहकारी बँकने नेहमीच अती सामान्य, गरजू व सर्व समाजातील सर्व स्थरातील नागरिकांच्या कर्जाच्या माध्यमातून गरजा पूर्ण करण्यासाठी व आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. बँकेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ,मुख्य शाखाधिकारी व त्यांचे सहकारी कर्मचाऱ्यांनीही बँकेला नफा मिळवून देण्यात परिश्रम घेतले आहे. भविष्यात यापुढेही बँकेची प्रगतीकडे घौडदौड अशीच सुरु राहणार आहे. मागील वर्षी गौतम बँक संपूर्ण तोटामुक्त झाल्यामुळे सभासदांना पुढील वर्षी लाभांश देण्याचे मी जाहीर केले होते त्याप्रमाणे रिजर्व बँकेने सभासदांना लाभांश देण्याची परवानगी दिल्यास मोठे मानसिक समाधान मिळणार असल्याचे आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram