साखर उद्योग जगवायचा असेल तर साखर निर्यात हाच सर्वोत्तम प्रभावी उपाय- आशुतोष काळे

गोदावरी कालव्यांचे लाभधारक शेतक-यांना उन्हाळी सिंचनासाठी आवर्तन मिळणार नाही. भीषण दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चालू वर्षी ऊस लागवडी झाल्या नाही त्यामुळे पुढील गळीत हंगामासाठी किती ऊस उपलब्ध होईल हे आज सांगणे कठीण असून २०१९/२० चा गळीत हंगाम हा दुष्काळाच्या सावटाखाली असणार आहे. परंतु ज्याप्रमाणे २०१६/१७ चा गळीत हंगाम अडचणीचा असतांना त्यावर मत करून गळीत हंगाम यशस्वी केला त्याप्रमाणे अतिशय अडचणीच्या २०१९/२० चा गळीत हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करू.आजच्या परिस्थितीमध्ये राज्य, देश आणि जागतिक स्तरावर साखरेचे उत्पादन, खप, वापर आणि शिल्लक साठ्याचा विचार केल्यास साखरेच्या दरावर दबाव राहणार असून साखर उद्योग जगवायचा असेल तर साखर निर्यात हाच सर्वोत्तम प्रभावी उपाय आहे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०१८/१९ च्या ६४ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे होते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०१८/१९ च्या ६४ व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे संचालक ज्ञानदेव दगू मांजरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. आशाताई ज्ञानदेव मांजरे यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा करून करण्यात आली. सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. याप्रसंगी पुढे बोलताना आशुतोष काळे म्हणाले की, यावर्षी कारखाना व्यवस्थापनाने २०१८/१९ या गळीत हंगामात ६.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले होते परंतु चालू वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील्यामुळे व गोदावरी कालव्याचे दोनच आवर्तन अतिशय कमी क्षमतेने मिळाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम ऊस वाढीवर झाला. कारखान्याच्या शेतकी विभागाने गेटकेन सेंटर निफाड, नाशिक, शेवता, राहुरी, गंगापूर, वैजापूर व चाळीसगाव आदी ठिकाणाहून ऊस आणला. या गळीत हंगामात एकून १६४ दिवस गळीत हंगाम सुरु होता. या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातून ४,५८,३२४ मे.टन व कार्यक्षेत्राबाहेरील १,८१,४९३ मे.टन असे एकूण ६,३९,८१७ मे.टन ऊसाचे गाळप करण्यात आले असून ६,९८,६७० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा हा १०.९२% एवढा मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली. गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी चालू हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला २३००/- रुपये दर जाहीर करून साखर विक्री परिस्थिती व जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या ऊस दराचा विचार करून योग्य तो दर देण्याचे आश्वासन दिले त्याप्रमाणे गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ दिवसातच रुपये २३००/- वरून सरसकट एकरक्कमी २५००/- रुपये दर देवून दिलेले आश्वासन पूर्ण केले. साखर उद्योग हा नेहमीच काहीना काही कारणामुळे अडचणीत सापडतो. केंद्र सरकारने २०१८/१९ च्या गाळप हंगामासाठी ठरवलेल्या एकरक्कमी दरामध्ये मागील वर्षापेक्षा २००/- रुपयांनी वाढ केली त्यावेळी केंद्र सरकारने साखरेचा बाजारातील दर हा रुपये ३४००/- गृहीत धरला होता. परंतु केंद्र सरकारकडून प्रथमत: साखरेला दर २९००/- रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळाला. साखर उत्पादन खर्चाचा विचार केल्यास तो प्रती क्विंटल रुपये ४२००/- पेक्षा अधिक असल्यामुळे कारखान्यांच्या शॉर्ट मार्जिंनचा प्रश्न निर्माण झाला. आहे त्याचबरोबर आयकराचा गहण प्रश्न साखर कारखानदारीपुढे निर्माण झाला असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले. २०१३/१४ व २०१४/१५ यावर्षी साखरेचे दर घसरल्यामुळे कर्ज घेऊन एफ.आर.पी.च्या रक्कम अदा केल्या होत्या. त्याचे हफ्ते आता भरावे लागत आहे. यावर्षीच्या एफ.आर.पी.ची रक्कम देण्याकरिता केंद्र सरकारने कारखान्यांना कर्ज योजना जाहीर केली असून या कर्जाचा बोजा पुढील हंगामापासून कारखान्यावर पडणार आहे. केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर ठरविण्याचे धोरण जाहीर केल्यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे. परंतु हा निर्णय केंद्र सरकारने यापुर्वीच घेतला असता तर कारखान्यांना शेतकऱ्यांची एफ.आर.पी. वेळेत देता आली असती व कारखानेही तोट्यात गेले नसते. त्यामुळे केंद्र सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणल्यास वावगं ठरणार नाही. आज साखरेचा दर हा २९००/- रुपयांवरून ३१००/- रुपये असूनही साखरेस मागणी नाही हे साखर उद्योगापुढे मोठे संकट असल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले. हंगाम यशस्वी केल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर, वाहतूक ट्रक धारक व कामगार व संबंधित घटकांचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील शिंदे, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर जयंत भिडे, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुपरिटेडेट बी. बी. सय्यद, वर्क्स मॅनेजर दौलतराव चव्हाण, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, नगरसेवक,सभासद, शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत संचालक अरुण चंद्रे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी सुनील कोल्हे यांनी केले तर संचालक सूर्यभान कोळपे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram