डाऊच येथे होणा-या इज्तेमागाह स्थळी आशुतोष काळेंची सदिच्छा भेट

कोपरगाव तालुक्यातील डाऊच येथे होणा-या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मुस्लीम बांधवांचा इज्तेमा २२ व २३ मार्च रोजी संपन्न होणार आहे. या इज्तेमासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मुस्लीम बांधव येणार आहेत. या मुस्लीम बांधवांची कशा प्रकारे नियोजन व व्यवस्था केली आहे याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी समक्ष भेट देवून जाणून घेतली. यावेळी इज्तेमाच्या आयोजक मुस्लीम बांधवांनी युवा नेते आशुतोष काळे यांना माहिती देतांना सांगितले की, या इज्तेमासाठी पुणे येथील हाफिज मंजूर साहब, तसेच मौलाना मोबीन, जावेद भाई यांचे बयान होणार आहे. मालेगाव येथील हाजी लाईक साहब, अहमदनगर येथील अब्दूसलाम भाई व मोहसीन भाई यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच इज्तेमा कमिटीच्या तालुक्यातील जुम्मेदारांनी मुस्लीम बांधवांसाठी दोन दिवस राहण्याची व वाहनतळाचे नियोजन, तालुकानिहाय बैठक व्यवस्था याची माहिती जाणून घेतली. या इज्तेमामध्ये शेवटच्या दिवशी अतिशय साध्या पद्धतीने विवाह पार पडणार असून त्यानंतर दुआ होणार असल्याची माहिती दिली. युवा नेते आशुतोष काळे यांनी सर्व माहिती आपुलकीने जाणून घेत कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास सर्वोतोपरी मदत करू अशी इज्तेमाच्या आयोजकांना ग्वाही दिली. याप्रसंगी फकीरमामू कुरेशी, हाजीबाबुभाई शेख, सलीमहाजी शेख, मेह्फुसभाई शेख, शफिकलाल शेख, मोहंमद शेख, इब्राहीम शेख, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण आदी उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram