मिळालेला पुरस्कार सीमेवर लढणाऱ्या सैनिक भावांना समर्पित - सौ. चैतालीताई काळे

डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या प्रसंगी देशासाठी बलिदान देणाऱ्या माझ्या सैनिक भावांचे कार्य अजोड आहे. आपण करत असलेल्या सामाजिक कार्यापेक्षा त्यांचे कार्य व त्यांची सेवा खूप मोठी आहे. म्हणून मला मिळालेला हा पुरस्कार मी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना समर्पित करत असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई आशुतोष काळे यांनी केले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून देण्यात येणारा जाणीव सांस्कृतिक अभियान या संस्थेचा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांना नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मा. राज्यमंत्री विनायकदादा पाटील व वीरमाता निलाताई आमले यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुरस्कार स्विकारण्यापूर्वी काश्मीरमधील पुलवामा येथे शहीद झालेल्या सी.आर.पी.एफ. जवानांना श्रद्धांजली वाहून सौ. चैतालीताई काळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, महसूल विभागाच्या अप्पर सचिव श्रीमती सोनलस्मित पाटील, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेचे जगन्नाथ पाटील तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram