भावी पिढी सुसंस्कृत घडविण्यासाठी संस्कृतीचा अभिमान बाळगा -सौ. चैतालीताई काळे

हळदी-कुंकवाचा वारसा महिलांना पुढे घेवून जायचा असून हा संस्कृतीचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुस-या पिढीकडे देण्यासाठी हळदी-कुंकू कार्यक्रम अतिशय उत्तम माध्यम आहे. आपली भावी पिढी सुसंस्कृत घडविण्यासाठी महिलांनी नेहमीच आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले. मकर संक्रांतीचे औचित्य साधत कोपरगाव तालुक्यातील करंजी व शिरसगाव येथे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या उपस्थितीत हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, महिला सशक्तीकरणाची गरज आहे. त्याचबरोबर आपली संस्कृती, धर्म, रूढी, परंपरा जोपासण्याची जबाबदारी महिलांची आहे याचा विसर पडू न देता आपल्या अनमोल संस्कृतीचा वसा जोपासला पाहिजे. यावेळी यावेळी जी.प. सदस्या विमलताई आगवन, सौ. भाग्यश्री आगवण, सौ. लक्ष्मीबाई आहेर, सायबुबी शेख, सौ. जयश्री आगवण, सौ. रुपाली गायकवाड, सौ. यशोदा शहाणे, सौ. ललिता लोखंडे, शिरसगावच्या सरपंच सौ. मंगल उकीर्डे, सौ.मनीषा चौधरी, सौ. विमल शिंदे, आशा केंद्राच्या सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच करंजी, शिरसगाव, खिर्डी गणेश, बोलकी, करंजी, ओगदी, अंचलगाव, पढेगाव आदी गावातील महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्या, तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram