महिलांनी अन्याय सहन न करता एकमेकींचा आधार बनावे - सौ. चैतालीताई काळे

प्रत्येक घरातूनच वंशाचा दिवा हवा या हट्टापायी आजही महिलांवर अत्याचार होत आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखणे काळाची गरज असून स्त्री भ्रूण हत्या थांबवायची असेल तर ते संस्कार आपल्या घरातूनच व्हायला हवे. त्यासाठी मुलगी नको फक्त मुलगाच हवा ही मानसिकता बदलली पाहिजे. महिलांनी एकमेकींचा आदर करून अन्याय सहन न करता एकमेकींचा आधार बनावे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले. जिल्हा परिषद अहमदनगर महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने माझी कन्या भाग्यश्री, बेटी बचाओ - बेटी पढाओ व पोषण अभियान योजनेची जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅन व संकल्प रथयात्रेचे कोपरगाव तालुक्यात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी स्वागत केले. याप्रसंगी चांदेकसारे येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते फीत कापून कोपरगाव तालुक्यात जनजागृती रथयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्या पुढे म्हणाल्या की, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी तसेच महिलांच्या पोषण आहाराबद्दल जनजागृती करण्यासाठी संकल्प रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्त्री आणि पुरुष यांचे प्रमाण सारखे होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून महिला जर एकमेकींचा आधार बनून राहिल्यास महिलांवरील अत्याचार कमी होतील असे सौ. चैतालीताई काळे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. अनुसयाताई होन, जी.प. सदस्या सौ. सोनालीताई रोहमारे, रोहिदास होन, राहुल रोहमारे, शंकरराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, मतीन शेख, संजय होन, सौ. वराडे, सौ. आढाव, सौ. खरे, सरपंच पूनम खरात, पोलीस पाटील मिराताई रोकडे, ग्रामसेवक सुपेकर, अंगणवाडी सेविका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram