हळदी-कुंकू कार्यक्रमातून महिलांच्या विचारांना उजाळा –सौ. पुष्पाताई काळे

आपण वर्षभर विविध सण उत्सव साजरे करीत असतो. या प्रत्येक सणामागे एक विशिष्ट परंपरा आहे. यामध्ये महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा मकरसंक्रांत सण असून या सणानिमित सप्ताहभर सुरु असलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारांची देवाण घेवाण होऊन महिलांच्या विचारांना उजाळा मिळत असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी कोपरगाव येथे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात केले. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या वतीने कोपरगाव येथे सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलतांना सौ. पुष्पाताई काळे म्हणाल्या की, महिला काही क्षण एकत्र आल्यामुळे संसारातील ताणतणाव विसरला जातो. हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला एकमेकींना भेटतात. यावेळी स्त्रिया आवर्जून उखाणे घेतात. या उखाण्यातून महिलांमध्ये असेलेली कल्पकता, कविवृत्ती जागृत होऊन हा आनंद एकमेकींबरोबर वाटला जातो. महिला एकत्र आल्यामुळे महिलांचे संघटन होण्यास मदत होते. आपल्या संस्कृतीचा वारसा व परंपरा टिकविण्यासाठी हळदी-कुंकू कार्यक्रम राबवविले पाहिजे असे सौ. पुष्पाताई काळे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी घेतलेल्या उखाण्यातून महिलांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण होऊन हजारो महिला महिला हळदी-कुंकू कार्यक्रमात रंगून गेल्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram