सौ. सुशीलामाईंच्या अट्टाहासातून मुलींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार – सौ. चैतालीताई काळे

माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या सहचारिणी सौ.सुशीलामाई काळे सरस्वतीच्या उपासक होत्या. ग्रामीण भागातील मुलींनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे अशी त्यांची तळमळ होती. सौ. सुशीलामाईंनी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांकडे मुलींसाठी महाविद्यालय सुरु करण्यासाठी केलेल्या अट्टाहासामुळे ग्रामीण भागातील मुलींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार झाले असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांनी केले. सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या २० व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, सौ.सुशीलामाई काळे यांच्याकडे मोठी दूरदृष्टी होती. त्या दूरदृष्टीतूनच अहमदनगर येथे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पहिले महिला महाविद्यालय व कोळपेवाडी व परिसरातील ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने हे महाविद्यालय सुरु झाले. त्यामुळे बाहेरगावी जावून उच्च शिक्षण घेवू न शकणा-या हजारो मुली उच्च शिक्षण घेवून उच्च पदावर विराजमान झाल्या आहेत. स्व. माईंच्या जीवनाचा आदर्श घेवून भविष्यात वाटचाल करावी हीच माईंच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सौ.सुशीलामाई काळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रथम बक्षिसाचा मानकरी आर. बी. एन. बी. महाविद्यालय श्रीरामपूर, द्वितीय बक्षीस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अशोकनगर तर तृतीय बक्षिसाचा मानकरी कै.नामदेवराव परजणे लॉ कॉलेज संघ ठरला आहे. या विजेत्या संघांना सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते रोख रक्कमेचे बक्षीस व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ यांनी माईंच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुनंदा कोळपे व कु. अरुणा दिवेकर यांनी केले तर प्रा. डॉ. सौ. सुनिता शिंदे यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram