गोदाकाठ महोत्सवात चार दिवसात ४० लाखाची उलाढाल |महिलांचा आत्मविश्वास द्विगुणीत – आशुतोष काळे.

कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने गोदाकाठ महोत्सव सुरु करण्यात आला. या २०१९च्या गोदाकाठ महोत्सवामध्ये चार दिवसात ४० लाख रुपयांची झालेली उलाढाल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास नक्कीच मोठा हातभार लागणार असून गोदाकाठ महोत्सवातून ग्रामीण भागातील महिलांचा आत्मविश्वास द्विगुणीत होणार असल्याचा विश्वास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. शुक्रवार दिनांक ४/१/२०१९ ते ७/१/२०१९ या कालावधीत प्रियदर्शनी महिला मंडळ कोपरगाव यांचे वतीने महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे गोदाकाठ महोत्सव २०१९ चे आयोजन करण्यात आले होते. या गोदाकाठ महोत्सवाच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोदाकाठ महोत्सवामध्ये सहभागी बचत गटाच्या महिलांचा त्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, समवेत जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे, चित्रपट अभिनेता संदीप साकोरे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, जी.प. सदस्य राजेश परजणे, कोपरगाव तालुका कॉंग्रेस अध्यक्ष राजेंद्र जाधव, ह.भ.प. मोहनराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या गोदाकाठ महोत्सवात १५० महिला बचत गटांचे स्टॉलस लावण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलसवर असलेल्या महिला त्यांनी तयार केलेल्या मालाची माहिती ग्राहकांना पटवून देतांना त्यांच्या चेह-यावरील ओसंडून वाहत असलेला महिलांमध्ये त्यांच्यामध्ये एक यशस्वी उद्योजक घडत असल्याचे चित्र प्रत्येक स्टॉलसवर दिसून येत होते. मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही महिला बचत गटांचा मोठा प्रतिसाद या गोदाकाठ महोत्सवाला मिळाला त्याचप्रमाणे महिला बचत गटाच्या तयार मालाची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी करून प्रतिसाद दिला. चार दिवसाच्या कालावधीत या गोदाकाठ महोत्सवात ४० लाखाच्या वर उलाढाल झाली असून खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना बचत गटाचे विविध घरगुती उत्पादने अतिशय स्वस्त दरात मिळत असल्यामुळे ग्राहकांची गर्दी सातत्याने वाढत होती. या गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.त्यामुळे महिला ख-या अर्थाने सबला आणि सक्षम होणार असून या गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील महिला बचत गटांना ख-या अर्थाने सक्षम करण्याचा उद्देश सफल होऊन महिला बचत गटांचा आणि महिलांचा उत्कर्ष होणार आहे. कोपरगाव तालुक्यातील महिला बचत गटाच्या तयार मालाला गोदाकाठ महोत्सव हक्काचे व्यासपीठ झाले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram