गोदाकाठ महोत्सवातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचे स्वप्न साकार - सौ. पुष्पाताई काळे

माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमी शेतकरी, कष्टकरी व समाजातील सर्वसामान्य जनेतेचे हित जोपासले. त्यांना महिलांविषयी अत्यंत आदर होता. महिलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे हे विचार माझ्या मनाला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे कर्मवीर काळे साहेबांचे आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून एक महिला म्हणून बचत गटांच्या महिलांसाठी गोदाकाठ महोत्सव सुरु केला. मागील काही वर्षापासून हा गोदाकाठ महोत्सव सुरु झाला परंतु दुस-याच वर्षी गोदाकाठ महोत्सवाला अडचणींचा सामना करावा लागला. एक वेळ तर गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन करू नये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी असंख्य बचत गटांच्या महिलांनी फोन करून बचत गटाच्या महिलांना चांगल्या प्रकारे अर्थसहाय्य मिळत आहे गोदाकाठ महोत्सव नियमितपणे सुरु ठेवा अशी आग्रही मागणी केली. त्यावेळी माजी आमदार अशोकराव काळे यांनीही मला उभारी दिल्यामुळे आजतागायत हा गोदाकाठ महोत्सव सुरु आहे. या गोदाकाठ महोत्सवाला बचत गटांच्या महिलांचा दरवर्षी मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद व गोदाकाठ महोत्सवातून महिला आर्थिक दृष्ट्‍या सक्षम होत असल्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचे स्वप्न साकार होत असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित गोदाकाठ महोत्सव २०१९ चे उदघाटन मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते आज पार पडले याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे, पंचायत समिती सभापती अनुसयाताई होन, नगरसेविका प्रतिभाताई शिलेदार, वर्षाताई कहार, माधवीताई वाकचौरे, ऐश्वर्याताई सातभाई, उमाताई वहाडणे, रमाबाई पहाडे, जी. प. सदस्या सोनालीताई रोहमारे, सोनालीताई साबळे, प.स. सदस्या पौर्णिमाताई जगधने, स्वप्नजाताई वाबळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, सर्व संचालक मंडळ, विजयराव आढाव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद, सदस्य, पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना सौ. पुष्पाताई काळे म्हणाल्या की, बचत गटाच्या महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी गोदाकाठ महोत्सव आयोजित करत असतांना माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचे स्वप्न पूर्ण करत असल्याचे मोठे समाधान लाभत आहे. आज गोदाकाठ महोत्सवामुळे बचत गटाच्या महिलांच्या उत्पादनाला दिल्लीपर्यंत मागणी येत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी आपल्यामध्ये असलेले कौशल्य, क्षमता फावल्या वेळेत सिद्ध करण्यासाठी वापरावी. त्या माध्यमातून आपला वेळ सत्कारणी लागेल व स्वत:च्या कुटुंबाचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यास महिलांचा हातभार लागणार आहे.यावर्षी काही बचत गटाच्या महिलांना स्टॉल्स मिळाले नाही त्यामुळे पुढील वर्षी स्टॉल्स वाढवावे लागणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले युवानेते आशुतोष काळे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आर्थिक दृष्ट्‍या स्वावलंबी होत आहे. गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असून महिला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहत आहे हे गोदाकाठ महोत्सवाचे मोठे यश आहे. बचत गटाच्या महिलांना मिळणारा आर्थिक लाभ हा मर्यादित न राहता त्यामध्ये सातत्याने वाढ व्हावी. महिला आर्थिकदृष्टया नेहमी सक्षम राहण्यासाठी आयोजित करण्यात आलेला गोदाकाठ महोत्सव बचत गटाच्या महिलांना प्रगतीच्या शिखराकडे घेवून जाणारा असल्याचे गौरवद्गार त्यांनी यावेळी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे म्हणाल्या की, गोदाकाठ महोत्सवाला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांमध्ये गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून मोठी आर्थिक ताकत मिळत असल्याचे प्रतीक आहे. यावेळी आदर्श बचत गटाच्या महिलांचा तसेच कोपरगावातील उद्योजक महिलांचा सौ. पुष्पाताई काळे, युवा नेते आशुतोष काळे व सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला.पहिल्या दिवशीच गोदाकाठ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून लाखो रुपयांची उलाढाल होणार असल्यामुळे भक्त गटांच्या महिलांच्या चेह-यावर समाधान पाहावयास मिळत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, कार्यकर्ते, बचत गटाच्या महिला तसेच शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. निर्मला कुलकर्णी व गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram