शासनाला खुश ठेवणा-या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे गोदावरी कालव्याच्या पहिल्याच आवर्तनाचा बट्ट्याबोळ - आशुतोष काळे

मागील चार वर्षापासून भाजपा चे सरकार आल्यापासून कालवा सल्लागार समितीची बैठक मुबईला होत आहे. या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसून त्याबाबत कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधी चकार शब्द काढीत नाही. त्यांच्या शासनाला खुश ठेवण्याच्या भूमिकेमुळे गोदावरी कालव्याच्या पहिल्याच आवर्तनाचा बट्ट्याबोळ झाला असून दुस-या आवर्तनाबाबत चिंता वाटत आहे. कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी आपली दुटप्पी भूमिका सोडून दुस-या आवर्तनाबाबत भूमिका जाहीर करावी असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी चांदेकसारे येथे विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना उद्देशून केले. तसेच कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना पायउतार केल्याशिवाय मुबईला होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात होणार नाही त्यासाठी कामाला लागा असा कार्यकर्त्यांना संदेश दिला. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे जिल्हा परिषद क वर्ग निधीतून आपल्या चांदेकसारे गावचे ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थानचे १० लाख रुपये खर्चाचे बालउद्यान तसेच चांदेकसारे गावातील बाळासाहेब खरात यांच्या घरापासून भैरवनाथ देवस्थानकडे जाणा-या ३ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ व १५ लाख रुपये खर्चाच्या साठवण बंधा-याचा लोकार्पण सोहळा युवानेते आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ. अनुसयाताई होन होत्या. ते पुढे म्हणाले की, मी तालुक्याच्या लोकप्रतिनिधी प्रमाणे कधीही हवाई पाहणी करीत नाही त्यामुळे गोदावरी कालव्याच्या आवर्तनावेळी माझे बारीक लक्ष होते. अडीच किलोमीटर पर्यंतच शेतीला पाणी देणार अशी कुणकुण माझ्या कानावर आली त्यावेळी मी पाटबंधारे विभागाचे अधिका-यांना भेटलो. सात नंबर अर्ज केलेल्या सर्वच शेतक-यांना पाणी द्या अशी मागणी केली. तरीही अधिकारी अडीच किलोमीटर पर्यंतच्या पुढील शेतीला पाणी देण्यास तयार नव्हते मी शेतक-यांसाठी करीत असलेली धडपड पाहून त्यावेळी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सर्वच शेतक-यांना पाणी मिळणार अशी नेहमीप्रमाणे पत्रकबाजी करून माझ्या शेतकरी हिताच्या भूमिकेला स्टंटबाजी म्हणून हिणावले. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या गाफिलपणामुळे शेतकरी आवर्तनापासून वंचित राहिले असून याचा जाब शेतकरी विचारल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या जीवावर आपण सत्ता भोगत आहोत त्या शेतक-यांच्या संसाराची काळजी करा असा सल्ला दिला. यावेळी सभापती सौ. अनुसयाताई होन, जि.प. सदस्य राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली रोहमारे, कर्मवीर काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील शिंदे, संचालक सचिन रोहमारे, आनंदराव चव्हाण, प.स. सदस्य गटनेते अर्जुनराव काळे,मधुकर टेके, पाराजी होन, नारायण होन, अॅड. राहुल रोहमारे, माजी सरपंच दौलत आहेर, भिमाजी होन,भिवराज दहे, संजय होन, शिवाजी बर्डे, जवळकेचे सरपंच बाबुराव थोरात, लक्ष्मण थोरात, सुधाकर होन, मधुकर होन, सय्यदनूर शेख,कैलास गव्हाणे, शांतीलाल पवार, पंचायत समिती शाखा अभियंता अश्विन वाघ, उपअभियंता यु.सी.पवार,शाखा अभियंता नितीन गायकवाड, शाखा अभियंता गावडे, गामविकास अधिकारी सुपेकर, आदी मान्यवरांसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण होन यांनी केले तर आभार अशोक होन यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram