जिल्हा परिषद शाळेचा दर्जा टिकवून ठेवा विद्यार्थ्यांचा ओघ वाढतच राहील - आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या पाचही गटामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेसची सत्ता आली तेव्हापासून जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक शाळेचा दर्जा हा उंचावला आहे. खाजगी शाळांच्या बरोबरीने आज जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थांचे सर्वांगीण भविष्य घडविण्यासाठी विविध उपक्रम राबवविले जात आहे. शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळेचा दर्जा असाच टिकवून ठेवल्यास विद्यार्थ्यांचा ओघ वाढतच राहील असा विश्वास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. ब्राम्हणगाव जिल्हा परिषद गटातील शाळांचा बाल आनंद मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी दहेगाव बोलका येथे ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ.विमलताई आगवण होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे कारभारी आगवण, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने आदी मान्यवर उपस्थित होते. बाल आनंद मेळाव्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर करून स्वागत केले. दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून बाल आनंद मेळावा कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्व स्टॉलची पाहणी, रांगोळी प्रदर्शन पाहणी केली. यावेळी ओगदी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी महेश राजेंद्र भालेराव याची इस्त्रो सहलीसाठी बाल वैद्यानिक म्हणून निवड झाल्याबद्दल महेश भालेराव व त्याचे वडील राजेंद्र भालेराव यांचा युवा नेते आशुतोष काळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सलग तीस-या वर्षी ओगदी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याची इस्त्रो सहलीसाठी बाल वैद्यानिक म्हणून निवड झाल्याबद्दल या शाळेच्या शिक्षकांचे कौतुक केले. याप्रसंगी गट शिक्षण अधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख आर. के. ढेपले, भास्कर वल्टे, अनिल वल्टे, जगन्नाथ बागल, नानासाहेब डोंगरे तसेच ब्राम्हणगाव गटातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram