नाताळ आनंद व हर्षोल्हासाचा सण – आशुतोष काळे

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात अनेक जाती धर्माचे नागरिक मोठ्या आनंदात एकत्रित नांदत असून आपल्या धर्माच्या परंपरा व शिकवणीनुसार सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात. विविध जाती धर्माच्या सण, उत्सव साजरे करण्यामागे विशिष्ट परंपरा व धार्मिक भावना जोडलेल्या असतात. त्याच प्रमाणे ख्रिश्चन बांधवही दरवर्षी मोठ्या धार्मिक भावनेतून उत्साहात नाताळ सण साजरा करतात. दया, क्षमा, शांती, परोपकाराची शिकवण देणारा व आनंद व हर्षोल्साचा नाताळ सण असल्याचे प्रतिपादन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. नाताळ सणानिमित्त कोपरगाव शहर तसेच तालुक्यातील विविध चर्चेमध्ये जावून आशुतोष काळे यांनी ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ख्रिश्चन बांधवांचे धर्मगुरू फादर व ख्रिश्चन बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी फादर रेव्हरेंट अजय भोसले, फादर जॉर्ज, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव आढाव, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, राहुल देवळालीकर आदि उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram