राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्याचे काम - सौ.चैतालीताई काळे

महाविद्यालयीन जीवनाबरोबरच विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून होत असते. शिबिराच्या माध्यमातून शिबीर काळात शिबिरार्थी विद्यार्थ्यांना आलेले अनुभव सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी मोलाची भूमिका बजावू शकतात. या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्याचे महत्वपूर्ण काम होत असून आजच्या तरुणाईमध्ये देश व समाजाप्रती जबाबदारीची ज्योत प्रज्वलित होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबीर सक्षम पर्याय असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर तसेच के.जे. सोमैय्या (वरिष्ठ) व के.बी रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय कोपरगाव व एस. एस. जी. एम. महाविद्यालय कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर-बहादरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या समारोप प्रसंगी सौ. चैतालीताई काळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य संदीप रोहमारे होते. त्या पुढे म्हणाल्या की, संपूर्ण कोपरगाव तालुक्याने आदर्श घ्यावा असा सामाजिक उपक्रम अंजनापूर ग्रामस्थ राबवीत आहे. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी अंजनापूर गावाचा आदर्श घ्यावा. या अंजनापूर गावामध्ये प्रत्येक नागरिकाच्या नावाने एक वृक्ष लावण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त जन्माला येणा-या प्रत्येक लहान बाळाच्या नावाने एक वृक्ष लावला जातो. तुम्ही पण तुमच्या गावात जावून हा उपक्रम राबवा. त्यामुळे आपला कोपरगाव तालुका समृद्ध तालुका तयार होऊ शकतो असा आशावाद त्यानी व्यक्त करून विद्यार्थ्यांनी अंजनापूर, बहादरपूर गावातील सर्व रस्ते, पाणी पुरवठा परिसर, ग्रामपंचायत व सोसायटी परिसर व स्मशानभूमि परिसर स्वच्छ करून वृक्षारोपण करून गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सभापती सौ. अनुसया होन, सरपंच सौ. कांताबाई गव्हाणे, उपसरपंच सौ. निर्मला गव्हाणे, गोदावरी दूध संघाचे संचालक यशवंत गव्हाणे, सीताराम गव्हाणे, माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, पोपट गव्हाणे, चंद्रभान गव्हाणे, जीजाबापू गव्हाणे, सौ. नीता गव्हाणे, बी. एन. गव्हाणे, बी.सी.गव्हाणे, भास्कर गव्हाणे, पर्वत गव्हाणे, कैलास गव्हाणे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक गव्हाणे, संजय गव्हाणे, बळीराम गव्हाणे, प्रदीप गव्हाणे, अॅड. रमेश गव्हाणे, विजय गव्हाणे, एकनाथ गव्हाणे, बापूराव गव्हाणे, सुजित कोल्हे, आदी मान्यवरांसह वृक्षवेध फौंडेशनचे कार्यकर्ते ,अंजनापूर व बहादरपूरचे ग्रामस्थ तसेच विविध कार्यकारी सोसायटी अंजनापूर व बहादरपूरचे चेअरमन, व्हा, चेअरमन, सर्व संचालक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजनापूर, बहादरपूरचे सर्व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शैलेन्द्र बनसोडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत डॉ. सौ. विजया गुरसळ यांनी केले सूत्रसंचालन गायकवाड बी. एस. यांनी केले. तर आभार कैलास गव्हाणे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram