शिक्षणाबरोबर देशसेवा व सामाजिक बांधिलकी जोपासा - आशुतोष काळे

आपल्या देशाला जगात आर्थिक महासत्ता होण्यासाठी तरुणाईचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी शिक्षणाबरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाण, देश सेवा व सेवा संस्काराची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाशी एकरूप होणे, स्वत:मध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, संकटकाळी व नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची पात्रता विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरासारखे उपक्रम राबविल्यास आपल्या देशाला प्रगतीचे शिखर गाठण्यास मदत होईल त्यासाठी शिक्षणाबरोबर देशसेवा व सामाजिक बांधिलकी जोपासा असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर तसेच एस. एस. जी. एम. महाविद्यालय कोपरगाव, के. जे. सोमैय्या (वरिष्ठ) के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर-बहादरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते. यावेळी पुढे बोलतांना आशुतोष काळे म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराद्वारे विद्यार्थ्यांमध्ये असलेले खेळ, वक्तृत्व, विविध प्रकारच्या कला व नेतृत्व आदी गुणांना वाव मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिबिराकडे एक संधी म्हणून पहावे व या संधीचे सोने करून आपले उज्वल भविष्य घडवावे असा मौलिक सल्ला त्यांनी उपस्थित शिबिरार्थी विद्यार्थ्यांना देवून उपस्थितांना नाताळ व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील शिंदे, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली रोहमारे, संदिप वर्पे, सचिन मुजगुले, राहुल रोहमारे, संदीप रोहमारे, लक्ष्मणदादा थोरात, सरपंच सौ. कांताबाई गव्हाणे, बळीराम गव्हाणे परबत गव्हाणे पोपटराव गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, भास्कर महाराज गव्हाणे, ज्ञानदेव, गव्हाणे, अॅड. रमेश गव्हाणे, कैलास गव्हाणे, सागर मंचलवार, बाळासाहेब राहणे, बाबसाहेब राहणे, शिवाजी राहणे, डॉ. अरुण गव्हाणे, अमोल पाडेकर, साहेबराव राहाणे, योगेश राहणे, प्राचार्य. डॉ. डी..पी. गाडे, (एस. एस. जी. एम. महाविद्यालय) प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ (सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालय), प्रा. डॉ. शैलेन्द्र बनसोडे, सौ. शिंदे मॅडम (मुख्याध्यापिका जी.प. शाळा अंजनापूर), महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, बापू वढणे, कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शैलेन्द्र बनसोडे यांनी केले तर आभार प्रा. संतोष जाधव यांनी मानले.यावेळी अंजनापूरचे ग्रामस्थ, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram