समाजसेवेची पवार साहेबांची शिकवण- आशुतोष काळे

राजकीय व सामाजिक जीवनात नेहमीच सर्व सामान्य नागरिक केंद्र स्थानी ठेऊन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी नेहमी तत्पर असले पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची शिकवण आहे. त्यांच्या आदर्श विचारांवर आपण वाटचाल करीत असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते आशुतोष काळे यांनी सांगितले. माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिराचे कोपरगाव येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन युवानेते आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. या शिबिरामध्ये कोपरगाव शहर व तालुक्यातील अनेक रुग्णांची विविध आजारांचे निदान करून मोफत औषधोपचार करण्यात आले. याप्रसंगी ह्रदयरोगतज्ञ डॉ राजेंद्र वाघडकर, अस्थिरोगतज्ञ डॉ. संजय उंबरकर, डॉ.मंजुषा गायकवाड, दंतरोगतज्ञ डॉ.कुणाल घायतडकर, डॉ.भाग्यश्री घायतडकर, बालरोगतज्ञ डॉ.आप्पासाहेब आदिक, डॉ. अमोल अजमेरे, डॉ चंद्रशेखर आव्हाड, डॉ तुषार गलांडे, डॉ.दीपक पगारे, डॉ. शिवाजी रोकडे, डॉ. राजेंद्र रोकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरपालिका गटनेते विरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, वर्षा कहार, सुनील शिलेदार, हिरामण कहार, संतोष चवंडके, नवाज कुरेशी, कृष्णा आढाव, विकास बेंद्रे, रावसाहेब साठे, नंदकुमार डांगे, चंद्रशेखर म्हस्के, राजेंद्र आभाळे, नितीन बनसोडे, नितीन साबळे, शिवा लकारे, चांदभाई पठाण, विजय बंब, ठकाजी लासुरे, योगेश नरोडे, नारायण तांबट, इम्तियाज अत्तार, अशोक लांडगे, कैलास मंजुळ, किशोर वाघ, बापू वढणे, वाल्मिक लहिरे, अंबादास वडांगळे, निखील डांगे, संतोष टोरपे, समीर वर्पे, अजीज शेख, बाला गंगुले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कोपरगाव शहर व तालुक्यातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram