कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना चालू हंगामात ऊसास सरसकट एकरकमी २,५०० रुपये प्रतीटन दर देणार

चालू वर्षाचा गळीत हंगाम सुरु होत असतांना ऊस दराच्या पहिल्या उचलीबाबत संपूर्ण जिल्ह्यात संभ्रम असतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०१८/१९ चा गळीत हंगाम शुभारंभ करतेवेळी कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी पहिली उचल रुपये २,३००/- प्रती टन जाहीर केली होती. त्यावरच न थांबता त्यामध्ये वाढ करण्याचे सुतोवाच त्यांनी केलेले होते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मिटिंग नुतीच पार पडली. त्या बैठकीमध्ये कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी प्रती टन रुपये २०० वाढ करून चालू हंगामाचा ऊस दर रुपये २,५००/- देनेबाबतचा निर्णय जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या उपस्थितीत जाहीर केला. त्या निर्णयाचे कारखान्याचे व्हा.चेअरमन सुनील शिंदे, जेष्ठ संचालक विश्वासराव आहेर, ज्ञानदेव मांजरे, बाळासाहेब बारहाते, पद्माकांत कुदळे या सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून काळे कारखान्याची जादा ऊस दर देण्याची परंपरा सुरु ठेवले बाबत समाधान व्यक्त केले. या बैठकीत कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी सविस्तरपणे आपले विचार मांडतांना ते म्हणाले की, यावर्षी दुष्काळाची अभूतपूर्व परिस्थिती, ऊस पिकावर हुमणी अळीचा प्रार्दुर्भाव, खरीप व रब्बी हंगामात इतर पिकांचे अत्यल्प उत्पादन, अडचणीत सापडलेला कांदा उत्पादक, या सर्व परिस्थितीत शेतकरी हा अत्यंत अडचणीत सापडलेला आहे. शेतक-यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे तसेच गेटकेन व कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांची वाढीव ऊस दर देनेबाबतची आग्रही मागणी विचारात घेवून कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील असा कोणताही भेदभाव न करता एकसमान एक रक्कमी एकरक्कमी रुपये २,५००/- प्रती टन ऊस दर देनेबाबत संचालक मंडळास विनंती केली असता ती सर्वानुमते मान्य करण्यात आली. यावेळी आशुतोष काळे यांनी हंगामातील गाळपासाठी खोडवे ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या दृष्टीने ठीबक सिंचनावर भर देणेबाबत आग्रही मत मांडले. कारखान्याने दिलेला जादा ऊस दर विचारात घेता सभासदांनी जास्तीत ऊस कारखान्याला गाळपास देणे सबंधी विनंती करून संचालक मंडळाने त्यासाठी विशेष प्रयत्न करावे असे सांगितले.तसेच कार्यक्षेत्रातील हुमणीग्रस्त ऊसाची प्राधान्याने तोड करण्याबाबत शेतकी विभागाला सुचना दिल्या व त्या संबंधी शेतकी विभागाने केलेल्या ऊस तोडणी कार्यक्रमाचा आढावा त्यांनी घेतला. कामगारांना देखील कार्यक्षमता वाढवून व काटकसरीने उत्पादन प्रक्रिया खर्च कमीत कमी करण्यास सांगितले. साखर कामगारांना एप्रिल महिन्यापासून नवीन वेजबोर्ड लागू होत असल्याने त्याचीही अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,कार्यकारी संचालक, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram