कोणत्याही गोष्टीत कमी नाही हे दाखवून द्या – आशुतोष काळे

परमेश्वराने तुमच्या मध्ये सुद्धा एक वेगळी ऊर्जा दिलेली आहे. प्रत्येकाला कलेची एक देणगी बहाल केली आहे तिचा उपयोग स्वत:साठी करा. जगात अशा अनेक व्यक्ति आहेत त्यांच्या शरीरात व्यंग असतांनाही त्यांनी संपूर्ण जगाला हेवा वाटावा अशी कामगिरी केली आहे. त्यांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवा. त्या व्यक्तींच्या प्रेरणेतून तुमच्या आयुष्याची वाटचाल निश्चितपणे सुखकर होईल. आयुष्य खुप सुंदर आहे त्याचा उपभोग घ्या. छोट्या छोट्या संकटाला घाबरुन जाऊ नका. सन्मानाने जगा आणि आपण कोणत्याही गोष्टीत कमी नाही हे जगाला दाखवून द्या. असा मौलिक सल्ला युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित भव्य दिव्यांग (अपंग) मेळाव्या प्रसंगी दिव्यांग बंधू भगिनींना दिला प्रहार अपंग क्रांती आंदोलन कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव येथे जागतिक अपंग दिनानिमित्त भव्य दिव्यांग (अपंग) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून युवानेते आशुतोष काळे बोलत होते. यावेळी युवानेते आशुतोष काळे यांनी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न स्तुत्य असल्याचे सांगत संघटनेचे विशेष कौतुक करून उपस्थित दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी व प्रश्न जाणून घेतले. दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू असे उपस्थितांना आश्वासन त्यांनी दिले. कोणतेही एक अपंगत्वसुद्धा सामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करायला पुरेसे असते. परंतु जन्मत:च मेंदूज्वरामुळे बालपणीच मूक-बधिरत्व आणि अंधत्व ही दोन्ही संकटांना न डगमगता या असामान्य स्त्रीने शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली आभाळभर अडचणींना तोंड देत आपले उच्चशिक्षण पूर्ण करणा-या अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका, लेखिका आणि समाजसेविका हेलन केलर यांच्या प्रतिमेचे युवा नेते आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार किशोर कदम, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष परमेश्वर कराळे, शहराध्यक्ष प्रवीण भुजाडे, तालुका उपाध्यक्ष जयश्रीताई सोळसे, अक्षय रत्नपारखी, शरद खिलारी, भाऊसाहेब पारखे, संदीप कवडे, राजेंद्र तासकर, विलास डोंगरे, हमीन शेख, प्रशांत चीमनपुरे, सौ. अनिता वाघ, निसार शेख, अफजल पठाण, करीम पटेल तसेच कोपरगाव शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram