आजची मुले देशाचे उद्याचे भविष्य - सौ. चैतालीताई काळे

मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. पुढची पिढी निरोगी बनली तरच आपले भविष्य उज्ज्वल आहे. यासाठी पालकांनी आपापल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कारण आजची मुले हि या देशाचे उद्याचे भविष्य आहे असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले. पंचायत समिती कोपरगाव व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील सर्व अंगणवाडी व शाळांमध्ये मंगळवार दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ पासून मिझल रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, आपल्याला जर आपला देश जगात आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहायचे असेल तर आपल्या देशाचे उद्याचे असलेले भविष्य म्हणजेच मुलांचे आरोग्य सशक्त ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळोवेळी देण्यात येणा-या लसीकरण मोहिमेत भाग घेवून या लसी मुलांना देणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांचे जीवघेण्या आजारापासून संरक्षण होऊ शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात जगभरात होणारे बदल लक्षात घेऊन त्या बदलांना सामोरे जाण्यासाठी मुलांचे आरोग्य नेहमी उत्तम राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आहारात जंक फूडचा समावेश टाळावा. या खाद्यपदार्थाना चव असते पण त्यात पौष्टिकता नावालाही नसते त्यामुळे शाळेत येणा-या प्रत्येक मुलाच्या डब्यामध्ये घरची पोळीभाजीच असावी. मुलांनी एकमेकांना आधार देत समाजाची व देशाची ताकत बनावे असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. कोपरगाव तालुक्यातील सोमय्या विद्यालय वारी, वीरभद्र विद्यालय दहेगाव बोलका, ग.र.औताडे विद्यालय पोहेगाव, छत्रपती शिवाजी विद्यालय गौतमनगर आदी ठिकाणी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येवून सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच पोहेगाव गटातील अंगणवाड्यांना मुलांचे उंची मोजण्यासाठी इन्फानटोमीटरचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसया होन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुनील शिंदे,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सौ. विमल आगवन, सौ. सोनाली रोहमारे, सोनाली साबळे, कोपरगाव नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. वर्षा कहार, सौ. माधवी वाकचौरे, पंचायत समिती सदस्य अर्जुनराव काळे, मधुकर टेके, श्रावण आसने, सौ. पोर्णिमा जगधने, सहाय्यक गटविकास अधिकारी वळवी, तालुका आरोग्य अधिकारी संतोष विधाते आरोग्य विभागाचे कर्मचारी व पालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram