गोदावरी कालव्याच्या सुरु असलेल्या व पालखेड कालव्याच्या येणा-या आवर्तनातून गावतळी, बंधारे भरून द्या – आशुतोष काळे

कोपरगाव विधानसभा मतदार संघात यावर्षी अतिशय कमी पाऊस झाला असून संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदार संघात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. जमिनीतील पाणी पातळी अतिशय कमी झाल्यामुळे ऐन हिवाळ्यातच विहिरींनी तळ गाठला आहे.सध्या कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे पाण्याचा टँकर सुरु असून भविष्यात कोपरगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी गोदावरी कालव्याच्या सध्या सुरु असलेल्या व पालखेड कालव्याच्या येणा-या आवर्तनातून गावतळी, बंधारे आवर्जून भरून द्यावे अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे सहकरी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. दिलेल्या निवेदनात आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, सध्या कोपरगाव तालुक्यात एक पाण्याचा टँकर सुरु आहे. परंतु काही दिवसातच प्रशासनाकडे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गावांची पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करणे बाबत मागणी वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाचा मोठा आर्थिक खर्च होऊनही सर्वच नागरिकांपर्यंत टँकरचे पाणी पोहोचेल याची शाश्वती नाही. त्यामुळे नागरिकांची विशेषत: महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होणार आहे. भविष्यात निर्माण होणारी पाणी टंचाईची परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी सध्या सुरु असलेल्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना पिण्यासाठी आवर्तन सुरु आहे. सदरच्या आवर्तनातून व पालखेड कालव्याच्या येणा-या आवर्तनातून तसेच भविष्यात देण्यात येणा-या शेतीच्या व पिण्याच्या आवर्तनातून गावतळी, बंधारे भरून द्यावे. जेणेकरून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांच्या पिण्याच्या तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे. गावतळी, बंधारे आवर्तनातून नियमित भरून मिळाल्यास शिरसगाव, सावळगाव, तीळवणी, आपेगाव, उक्कडगाव, कासली, पढेगाव, ओगदी, करंजी, अंचलगाव आदी गावांचा बिकट झालेला पाणी प्रश्न काही अंशी मार्गी लावण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांची टँकर मागणी कमी होऊन नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram