आशुतोष काळेंच्या उपोषणामुळे शेतक-यांना मिळणार २.७५ कोटी बोंड अळीचे अनुदान

कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी शेतक-यांसह कोपरगाव तहसील कार्यालया समोर सोमवार दिनांक २२/१०/२०१८ पासून आमरण उपोषण केले होते. कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीत सामविष्ट करावे या प्रमुख मागणी बरोबरच वीज भारनियमन वेळापत्रकामध्ये बदल करून शेतक-यांना दिवसा पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, बोंड अळीच्या नुकसान भरपाई पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी. २०१५/१६ च्या रब्बी अनुदानापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बीचे अनुदान मिळावे. कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणा-या चार नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरु करावे आदी मागण्या युवा नेते आशुतोष काळे यांनी आमरण उपोषणाच्या माध्यामतून प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यावेळी आशुतोष काळे यांच्या आमरण उपोषणाची दुस-या दिवशी प्रशासनाने दखल घेवून जिल्हाधिका-यांनी कोपरगाव तालुक्याच्या दुष्काळाच्या वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविला असलयाचेअप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी पत्र प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे यांनी युवा नेते आशुतोष काळे यांना दिले होते. तसेच दिवाळी पर्यंत शेतक-यांना बोन्ड अळीचे पैसे देणार, विजेचे सुधारित वेळापत्रक तयार करणार, कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणा-या चार नंबर साठवण तलावाच्या कामासाठी जनरल बोर्डाच्या मिटिंगमध्ये १४ व्या वित्त पैसे मंजूर करून घेणार, २०१५ च्या रब्बीचे अनुदान देणार असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आशुतोष काळे यांनी शेतक-यांसोबत सुरु केलेले आपले आमरण उपोषण मागे घेतले होते. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याप्रमाणे दिवाळीपूर्वीच बोन्डअळीचे अनुदानापासून वंचित असणा-या कोपरगाव तालुक्यातील शेतक-यांच्या खात्यात २.७५ कोटी बोन्ड अळीचे अनुदान जमा होणार आहे. त्यामुळे आशुतोष काळे यांच्या आमरण उपोषणामुळे बोन्डअळीचे अनुदानापासून वंचित असणा-या शेतक-यांना एवढ्या भयानक दुष्काळी परिस्थितीमध्ये दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी काही प्रमाणात का होईना हातभार लागणार आहे त्यामुळे शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून शेतक-यांनी युवा नेते आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram