कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीत सामाविष्ट करावे यासाठी आशुतोष काळेंचे आमरण उपोषण सुरु | शेकडो शेतकरी बसले उपोषणाला

काही दिवसांपूर्वी शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून अनपेक्षितपणे कोपरगाव तालुक्याला वगळण्यात आले होते. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी हजारो शेतक-यांसह निषेध आंदोलन करून कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांना कोपरगाव तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत येत्या आठ दिवसात समावेश करावा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा ईशारा सोमवार दिनांक १५/१०/२०१८ रोजी दिलेला होता. प्रशासनाने आठ दिवसात कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीत सामाविष्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली प्रशासनाकडून झाल्या नाही. त्यामुळे युवा नेते आशुतोष काळे यांनी आमरण करण्याचा दिलेला शब्द पूर्ण करतांना हजारो शेतक-यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय कोपरगाव येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या सोबत शेकडो शेतकरी व नागरिक उपोषणाला बसले आहेत. कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करावे या प्रमुख मागणी बरोबरच वीज भारनियमन वेळापत्रकामध्ये बदल करून शेतक-यांना दिवसा पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, बोंड अळीच्या नुकसान भरपाई पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी.२०१५/१६ च्या रब्बी अनुदानापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बीचे अनुदान मिळावे. कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणा-या चार नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरु करावे आदी मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु ठेवले आहे. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर केले असतांना कोपरगाव तालुक्यासाठी असा कोणता निकष लावण्यात आला आहे की, तालुक्यात कमी पर्जन्यमान असतांना तालुक्यात पाऊस जास्त झाला असे दाखवून तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले. अधिकारी, शासनकर्ते हे लोकप्रतिनिधींचे असतांना शासनाकडे कोपरगाव तालुक्याच्या जनतेची व शेतक-यांची जाणीव नसलेल्या लोकप्रतिनिधी तालुक्याची वास्तव पारीस्थिती मांडता आली नाही. तालुक्यातील शेतकरी पाण्याअभावी अडचणीत आला आहे. शेती व पुरेसे पाणी नाही. कोपरगाव शहराला पिण्यासाठी आजही चार दिवसाआड पाणी मिळते इतकी भीषण परिस्थिती तालुक्याची आहे. बॉंड अळीने नुकसान झालेल्या शेतक-यांना अजून पावणे तीन कोटीचे अनुदान मिळालेले नाही. विजेचा प्रश्न गंभीर आहे. कर्जमाफी अजूनही कागदावरच आहे. अशा परिस्थितीत धरण क्षेत्रावर अवलंबून असणा-या कोपरगाव तालुक्याचे पाणी जायकवाडीला देण्यासाठी बैठकांवर बैठका सुरूं आहे. अशा परिस्थितीत कोपरगाव तालुक्याच्या सत्ताधारी लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प बसल्या आहेत. त्यांचा मी निषेध करतो जोपर्यंत कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, राजेंद्र खिलारी, अनिल गायकवाड, सतीश काकडे, मेहमूद सय्यद, डॉ. अजय गर्जे यांसह अनेक शेतकरी व नागरिकांनी कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळल्याबद्दल सरकारचा निषेध केला. आशुतोष काळे यांच्या आमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी सताधारी पक्षाचे कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाठीमाबा देत भाजपा सरकारचा निषेध करून आशुतोष काळे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे जाहीर केले. यावेळी कोपरगाव तालुका राष्ट्रीय कॉंग्रेस, नरेंद्र मोदी विचार मंच, एम आय एम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय लहूजी सेना, महात्मा फुले समता परिषद, औषध विक्री संघटना, सुवर्णकार समाज संघटना, गोदावरी चालक मालक संघटना, धनगर व क्षत्रिय सेवा संघ, प्रहार अपंग क्रांती आंदोलन, एकतावादी रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पक्ष (गवई गट), आर पी आय (आठवले गट), महाराष्ट्र राज्य छावा क्रांतिवीर संघटना, मुस्लिम विकास कमिटी, विना अनुदानित कृती समिती, अल एकता सोशल फाउंडेशन, नाभिक समाज संघटना, डॉ. असोसिए शन, महाराष्ट्र शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी आंदोलनात सहभागी झाले. द्र्माय्न आशुतोष काळे यांचे आमरण उपोषण मागे घ्यावे यासाठी किशोर कदम, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर आदींनी विनंती केली. तहसीलदार किशोर कदम यांनी उपोषणस्थळी जावून आशुतोष काळे यांची प्रशासनाच्या वतीने विनंती केली. पंधरा दिवसाचा अवधी द्यावा. मला मान्य आहे एका सर्कलमध्ये पडलेला पाऊस हा संपूर्ण कोपरगाव तालुक्यात पडत नाही. केंद्र सरकारच्या निकषानुसार तीन ते चार आठवड्याचा पावसाचा खंड पडल्यास दुष्काळ जाहीर होतो. परंतु राज्य शासनानच्या नवीन नियमानुसार सरसकट २८ दिवसाचा खंड पडणे आवश्यक आहे प्रशासनाच्या वतीने आपल्या आमरण उपोषणाची दखल जिल्हाधिका-यांनी घेतली असून प्रशासन कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी सत्य परिस्थितीचा अहवाल शासनाला पाठवू आपण आपले उपोषण सोडावे अशी आशुतोष काळेंना विनंती केली. त्यावेळी आशुतोष काळे यांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी आम्हाला लेखी आश्वासन देतील त्यावेळी विचार करू असे तहसीलदार किशोर कदम यांना सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, सर्व नगरसेवक, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष युवक तालुका अध्यक्ष शहर युवक अध्यक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, सर्व संचालक तसेच अनेक सलग्न संस्थांचे वं विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. आज आमरण उपोषणाच्या १ ल्या दिवशीच शेतक--यांनी वं तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती उद्याही मोठी गर्दी होणार आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram