कोपरगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करा अन्यथा आमरण उपोषण करणार –आशुतोष काळे

कोपरगाव तालुका पर्जन्यछायेखाली असल्यामुळे दरवर्षी कोपरगाव तालुक्यात अतिशय कमी पाऊस पडतो.यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी हंगामाची शाश्वती नाही.वाढलेल्या तापमानामुळे विहिरीच्या पाणी पातळीत सातत्याने घट होत आहे. दुष्काळात तेरावा महिना यावा त्याप्रमाणे महावितरणकडून कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशी दुष्काळाची भयावह परिस्थिती असतांना कोपरगाव तालुक्याला जाणीवपूर्वक दुष्काळी तालुक्याच्या यादीतून वगळले जाणे हा कोपरगाव तालुक्यातील शेतक-यांवर व नागरिकांवर मोठा अन्याय असून कोपरगाव तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून आठ दिवसाच्या आत जाहीर न केल्यास व शेतीचे भारनियमन वेळापत्रक पत्रक बदलून दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा झाला नाही तर आपण हजारो शेतकरी व नागरिकांसह सोमवार दिनांक २२/१०/२०१८ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू असा ईशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांना दिलेल्या निवेदनातून प्रशासनाला दिला आहे. शासनाकडून नुकतीच राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये कोपरगाव तालुक्याच्या लगत असणा-या वैजापूर, सिन्नर, राहाता या तालुक्यांचा समावेश आहे मात्र कोपरगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही कोपरगाव तालुक्याचा मात्र दुष्काळी तालुक्याच्या यादीत सामावेश करण्यात आलेला नाही.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.कोपरगाव तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश करावा तसेच महावितरणणे मोठ्या प्रमाणात सुरु केलेले भारनियमन तातडीने बंद करावे. शेतीसाठी करण्यात येणारा वीजपुरवठा रात्रीऐवजी दिवसा पुरेशा दाबाने करावा. वाढलेली महागाई व दररोज वाढत असलेले इंधनाचे नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलतांना आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या सीमेवर असणा-या संगमनेर,वैजापूर, सिन्नर, राहाता, येवला, निफाड आदी तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत सामावेश असतांना कोपरगाव तालुक्याला जाणीवपूर्वक वगळले जाते हा कोपरगाव तालुक्याच्या जनतेवर अन्याय आहे. यापूर्वीही रब्बीच्या अनुदानापासून कोपरगाव तालुका वंचित राहीला आहे.बोंडअळीच्या चुकीच्या सर्व्हेक्षणामुळे अजूनही बरेच शेतकरी बोंडअळीच्या नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. सातत्याने कोपरगाव तालुक्याच्या जनतेवर एवढा अन्याय होत असतांना कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळणे हे तालुक्याच्या शेतक-यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. गोदावरी कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन आजपर्यत झाले नाही. दुष्काळ परिस्थितीचा विचार केल्यास भविष्यात धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित राहू शकते.त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळेल का नाही याची खात्री नाही. काही दिवसातच कोपरगाव तालुक्याला पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवणार आहे.जानेवारी–फेब्रुवारी मध्येच पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. पाणी टंचाई बरोबरच जनावरांच्या चा-याचाही मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. एवढी भयावह परिस्थिती कोपरगाव तालुक्याची असून कोपरगाव तालुक्यातील शेतक-यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.त्यासाठी शासनाने येत्या आठ दिवसात कोपरगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अन्यथा शासनाच्या विरोधात आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, युवक अध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, सभापती सौ.अनुसयाताई होन,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, उपसभापति अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, कारभारी आगवण, राहुल रोहमारे,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन राधु कोळपे, कोपरगाव जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, पंचायत समितीचे उपसभापति अनिल कदम, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, सुधाकर रोहोम, ज्ञानदेव मांजरे, अशोकमामा काळे, विठ्ठलराव आसने, सचिन रोहमारे, अशोक तीरसे, हरिभाऊ शिंदे, सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, हिरामण गंगूले, अजीज शेख, दीपक साळुंके, कृष्णा आढाव, संतोष चवंडके,चन्द्रशेखर म्हस्के, विकास बेद्रे, समीर वर्पे, राजेंद्र आभाळे, विजय चवंडके, वाल्मिक लाहीरे, हारुण शेख, प्रसाद उदावंत, नितीन बनसोडे,डॉ. तुषार गलांडे, अशोक लांडगे, किशोर वाघ, विजय नागरे, संतोष दळवी, दिनकर खरे, राहुल देवळालीकर,राजेंद्र खैरनार, निखील डांगे, योगेश नरोडे, संतोष टोरपे, रावसाहेब साठे, राजेंद्र जोशी, बाला गंगूले, दिनेश पवार, बापू वढणे, अॅड.मनोज कडू, अंबादास वडांगळे, स्वप्नील पवार, तेजस साबळे, सचिन खैरनार, किरण आढाव, तुषार नरोडे, डॉ. दिलीप जगताप, युसुफ पठाण आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram