स्वाईन फ्ल्यू व साथीचे आजारांना पायबंद घालण्यासाठी आशुतोष काळेंनी घेतली आरोग्य अधिका-यांची बैठक

कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत ७ नागरिकांना स्वाईन फ्ल्यूच्या आजाराने दगावल्या आहेत त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून स्वाईन फ्ल्यूच्या भीतीपोटी नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. कोपरगाव तालुक्यात स्वाईन फ्ल्यू व साथीच्या आजाराने थैमान घातले असून या आजारांना तातडीने पायबंद कसा घातला जावू शकतो यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रमुख अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील नागरिकांना भीतीच्या सावटातून बाहेर काढण्यासाठी नागरिकांमध्ये स्वाईन फ्ल्यू आजाराबाबत जनजागृती करून नागरिकांच्या मनातील भीती दूर करून योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्या अशा सुचना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रमुख अधिका-यांना पार पडलेल्या बैठकीत दिल्या . कोपरगाव येथे गौतम बँकेच्या सभागृहात युवा नेते आशुतोष काळे यांनी तालुक्यातील आरोग्य अधिका-यांची तातडीची बैठक घेवून कोपरगाव तालुक्यात स्वाईन फ्ल्यू व साथीचे आजार यांचा प्रसार होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यासंबंधी मार्गदर्शन करून सध्या सुरु असलेल्या उपाय योजनांबाबत माहीती जाणून घेतली व संबंधीत अधिका-यांशी त्यांनी चर्चा केली. नागरिकांचे आरोग्य हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आरोग्य अधिका-यांनी काम करावे. नागरीकांना विविध आजाराबाबत माहीती देवून त्यांच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर करा.स्वाईन फ्ल्यूचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी माहीती पत्रकाच्या माध्यमातून जनजागृती करा. विविध आजारांवर आवश्यक असलेला पुरेसा औषधसाठा मिळवा अडचणी आल्यास मला सांगा. यावर्षी पाऊस अतिशय कमी पडला आहे त्यामुळे तापमानात झालेली वाढ विविध आजारांना आमंत्रण देत आहे. त्यामुळे स्वाईन फ्ल्यू बरोबरच सर्दी, खोकला, ताप व इतर आजारांकडे आरोग्य अधिका-यांनी गांभीर्याने पाहून नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी आपल्या आरोग्य केंद्रावर नियमित हजर रहावे. तसेच कोपरगाव तालुक्यातील नऊ वर्ष ते पंधरा वर्ष वयाच्या मुलांना मिझल (गोवर) अॅंड रुबेला नावाची लस एकत्रितपणे द्यावयाची असून त्यासाठी आरोग्य अधिका-यांनी नियोजन करावे तसेच नागरिकांनी आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवून आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा असे आवाहन केले. या बैठकीस सहाय्यक गटविकास अधिकारी महेश वळवी, डॉ.संतोष विधाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बडदे, डॉ.अनिकेत कुटे, डॉ. ए.पी. आढाव, डॉ. प्रज्ञा भगत, आरोग्य सहाय्यक नंदराम वाघ, भीमा बनसोडे, सुनिता पवार, वीरेंद्र वाकचौरे, डॉ. भांगे, सभापती सौ. अनुसयाताई होन, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सोनाली रोहमारे, कारभारी आगवण, राहुल रोहमारे,प्रसाद साबळे, उपसभापती अनिल कदम, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, पोर्णिमा जगधने, आदी उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram