कोणताही भेदाभेद न करता सरसकट २३०० रुपये ऊस दर देवून कर्मवीर काळे कारखाना तोटा मुक्त केला – आशुतोष काळे

मागील वर्षीचा २०१७/१८ चा गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वीच राज्यातील व जिल्ह्यातील शेतकरी संघटनांची गाळपासाठी येणा-या ऊसाला प्रती मेट्रीक टन ३,५००/- रुपये दर मिळावा यासाठी आंदोलने सुरु केली होती. कारखान्याचा गळीत हंगाम सुरु असतांना साखरेचे दर ३,५००/- ते ३,६००/- रुपये प्रती क्विंटल होते. मात्र त्यांनंतर सातत्याने साखरेच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली. तरीही ऊस उत्पादक शेतक-यांचे हित लक्षात घेवून कारखान्याची एफ. आर. पी. रक्कम रुपये १,८८४/- एवढी असतांना कोणताही भेदाभेद न करता २०१७/१८ चा गळीत हंगाम सुरु झाल्यापासून ते शेवटपर्यंत प्रती टन रुपये २,३००/- प्रमाणे ऊस दिला. त्याच बरोबर मागील वर्षीच्या सर्वसाधारण सभेत सांगितल्याप्रमाणे यावर्षी आपला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना संपूर्ण तोटामुक्त केला असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी कारखान्याच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना दिली तसेच कारखान्यास चालू आर्थिक वर्षात १५ कोटी ९५ लाख रुपये नफा मिळाला असून मागील वर्षाचा संचित तोटा रुपये १० कोटी १२ लाख वजा जाता चालू अहवाल सालात कारखान्याला निव्वळ नफा रुपये ५ कोटी ८२ लाख झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी कारखान्याचे जेष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, व्हा. चेअरमन सुनील शिंदे, जेष्ठ नेते छबुराव आव्हाड, कारभारी जाधव, सुधाकर आवारे, कारभारी आगवन, लहानुभाऊ नागरे, अॅड. आर. टी. भवर, अॅड. शंतनू धोर्डे, अॅड. एस. डी. औताडे, संभाजीराव काळे, सर्व संचालक मंडळ, सर्व संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, ,पंचायत समिती सभापती, सदस्य,नगरपालिकेचे सदस्य, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जयंत भिडे, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुपरिटेंडेंट बाबा सय्यद, कारखान्याचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात बोलतांना आशुतोष काळे पुढे म्हणाले की, मागील वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात १०१ सहकारी व ८६ खाजगी असे १८७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. राज्यामध्ये ९५२.४७ लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन १०७.०८ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा हा ११.२४ राहिला आहे. राज्यामध्ये गेल्या ६० वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक साखर उत्पादन हे २०१७/१८ च्या गाळप हंगामात झाले आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी ५.५० मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. कारखान्याने १६८ दिवसांच्या गाळप हंगामात कार्यक्षेत्रातील ३,९५,९२३ व व कार्यक्षेत्राबाहेरून २,३५,७४५ असा एकूण ६,३१,६६८ मे. टन ऊसाचे गाळप करून ६,५९,३०० क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरसरी साखर उतारा १०.४३ राहिला आहे. मागील वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे व कार्यक्षेत्रातील पाण्याची परिस्थिती चांगली असल्यामुळे ऊसाचे हेक्टरी उत्पादन ८ ते १० टक्क्याने वाढले त्यामुळे कारखाना उद्दिष्टापेक्षा जास्त गाळप करू शकला असल्याचे त्यांनी सांगितले. २०१८/१९ च्या गळीत हंगामात देशपातळीवर विक्रमी ३५० लाख मे.टन साखर उत्पादन होईल असा इस्माचा (इंडियन शुगर मिल्स असोसिएशन) अंदाज आहे. आज देशामध्ये ५४.३५ लाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र गाळपास उपलब्ध होईल. देशातील साखरेचा खप हा २५०ते २६० लाख टन आहे. मागील हंगामातील १०० लाख टन साखर शिल्लक असून यामध्ये चालू हंगामातील अंदाजे होणारे ३५० लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे. त्यानुसार देशाची साखर गरज पूर्ण करून ९० लाख मे.टन साखर शिल्लक राहणार आहे. मागील वर्षातील १०० लाख मे.टन व चालू वर्षातील ९० लाख मे. टन साखर अशी एकूण १९० लाख मे. टन साखर हंगाम २०१८/१९ अखेर शिल्लक राहणार असून ही साखर देशाला पुढील नऊ महिन्यापर्यंत पुरणार त्यामुळे पुढील गळीत हंगाम नाही घेतला तरी चालू शकणार आहे अशी शिल्लक साखरेची परिस्थिती आहे. देशातील अति साखरेच्या उपलब्धतेमुळे नवे प्रश्न साखर कारखानदारीपुढे उभे राहणार आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची निर्यात करून साखर साठ्याचा निपटारा केल्यास आपल्या देशाला बुहुमुल्य परकीय चलन प्राप्त होऊ शकते. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांना नेहमीच ऊस उत्पादक शेतक-यांची काळजी होती. केंद्र शासनाच्या अन्न पुरवठा मंत्रालयाने जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या नियमानुसार कोणताही साखर कारखाना व साखर उत्पादकास २,९००/- रुपये पेक्षा कमी दराने साखर विक्री न करण्याचा घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे साखर कारखान्यांना एफ. आर. पी. रक्कम काही प्रमाणात देणे सुकर झाले आहे या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. तथापि एफ. आर. पी. रक्कम रुपये २०० ने वाढवली आहे त्यामुळे साखरेची विक्री किंमत ही प्रती क्विंटल ३,६००/- रुपये करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram