मायगाव देवीची रखडलेली पाणी योजना तातडीने मार्गी लावा आशुतोष काळेंच्या अधिका-यांना सुचना

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या मायगाव देवी येथील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याची गेल्या कित्येक वर्षापासून मोठी अडचण होती. गावात सर्वत्र क्षारयुक्त पाणी असल्यामुळे महिला भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असे. महिलांची होत असलेली अडचण लक्षात घेवून माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात २०१२-१३ साली मायगाव देवी गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून मायगाव देवी गावासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती. या योजनेसाठी तब्बल १ कोटी ४६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आल होता व यापैकी ४० लाख रुपयांचा निधी हा तातडीने मायगाव देवी ग्रामपंचायतच्या खात्यावर जमाही करण्यात आला होता. त्या निधीतून पाणी पुरवठ्यासाठी खोदण्यात आलेल्या विहिरीचे काम २०१७ सालीच पूर्ण झाले आहे मात्र वितरण व्यवस्थेचे काम आजही काही राजकीय विध्वंसक वृत्तींच्या व्यक्तींनी बंद पाडून मायगाव देवीच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. आमच्या गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी निधी असूनही काम बंद आहे. हे काम सुरु होऊन ही पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावे असे साकडे मायगाव देवीच्या ग्रामस्थांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांना घातले होते. मायगाव देवीच्या ग्रामस्थांची होत असलेली ससेहोलपट पाहून युवा नेते आशुतोष काळे यांनी तातडीने कारखाना कार्यस्थळावर सबंधित अधिका-यांची बैठक घेवून मायगाव देवी पाणी पुरवठा योजनेचे काम निधी उपलब्ध असूनही का बंद आहे. हे काम कधी सुरु करणार याबाबत माहिती जाणून घेतली. पार पडलेल्या बैठकीत आशुतोष काळे यांनी सबंधित अधिका-यांना मायगाव देवी गावात वापरण्यासाठी पाणी भरपूर आहे मात्र पिण्यासाठी नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. पिण्याचे पाणी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून योजनेमध्ये येत असलेल्या अडचणी तातडीने दूर करून या पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने मार्गी लावा अशा सुचना केल्या. सदर बैठकीच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, पंचायत समिती सदस्य गटनेते अर्जुन काळे, जिल्हा परिषदचे मुख्य अभियंता अन्वर हुसेन तडवी, पंचायत समिती उपअभियंता यु. सी.पवार, संदेश सातपुते, मायगाव देवीचे ग्रामविकास अधिकारी बी.ओ. पाटील, उपसरपंच संजय गाडे, सदस्य दत्तात्रय पेंढारे, बाबासाहेब गाडे, अशोक कदम तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram