समाज घडविण्यासाठी व समाजाच्या विकासासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – आशुतोष काळे.

आधुनिक युगात अनेक क्षेत्रात परिवर्तन होत असल्याने शिक्षण क्षेत्रातही अमुलाग्र बदल होण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांना सामाजिक जीवनात समाधानी ठेवले तर समाजहिताची जपवणूक करता येईल. शिक्षकांतील कल्पकता विकसित करन्यासाठी शिक्षक दिनाचे आयोजन केले जाते ही खूप समाधानाची बाब असून समाज घडविण्यासाठी व समाजाच्या विकासासाठी शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागांतर्गत आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात तेे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन शंकररावजी कोल्हे होते. पुढे बोलतांना आशुतोष काळे म्हणाले की,शिक्षक दिनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांची सफलता, गुणवत्ता सर्वांसाठी आनंददायी असून नवीन पिढीच्या सफलतेवर समाजाचा विकास निश्चित होत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत शंकररावजी कोल्हे यांनी शिक्षकांबरोबर सुसंवाद करून समाजहिताची जाणीव ठेवूनच समाजाचा विकास करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य कारभारी आगवन, विजयराव आढाव, डॉ.शीला गाढे, सुनील देवकर, डॉ. निलेश मालपुरे व कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी,शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे बापू वढणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रभारी प्राचार्य डॉ. डी.पी.गाढे यांनी शिक्षक दिनाचे महत्व व उद्देश विशद केला. अतिथीचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. गणेश विधाटे यांनी करून दिला. तर आभार उपप्राचार्य नानासाहेब देवकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब शेंडगे, प्रा. छाया शिंदे व प्रा.चित्रा करडे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालायचे उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब निघोट, डॉ. कांदळकर, प्रा. संजय शेटे,सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram