१७१ व्या अखंड हरीनाम सप्ताहामध्ये चैतालीताई काळेंची सेवा

१७० वर्षाची ऐतिहासिक, धार्मिक परंपरा असना-या प.पु. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा १७१ वा अखंड हरीनाम सप्ताह श्री. क्षेत्र शिर्डी येथे सुरु आहे. या सप्ताह सोहळ्यास जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी भेट दिली व सरालाबेटाचे उत्तराधिकारी महंत रामगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेवून प्रवचनाचा लाभ घेतला. यावेळी सौ. चैतालीताई काळे यांनी सप्ताह स्थळी बुंदीचा महाप्रसाद तयार करण्याचे काम सुरु असलेल्या स्वयंपाकगृहामध्ये बुंदी सुकविण्याची सेवा केली. यावेळी सौ. चैतालीताई काळे म्हणाल्या की, संपूर्ण जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री. क्षेत्र शिर्डी येथे प.पु. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा १७१ वा अखंड हरीनाम सप्ताह होत आहे हा दुग्धशर्करा योग असून आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप भाग्याची गोष्ट आहे. मा.खा. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांना संत, महात्म्यांप्रती मनस्वी खूप आदर होता तीच परंपरा काळे परिवार जोपासत आहे. संतविना प्राप्ती नाही । ऐसे वेद देती ग्वाही या संतांच्या उक्तीप्रमाणे संत आपणा सर्वांना जीवनरूपी भवसागरातून तरून जाण्यासाठीचा मार्ग दाखवतात. संतांनी आयोजित केलेल्या धार्मिक सप्ताहस्थळी अनेक जाती धर्माचे भक्त सेवा करीत आहे. मुस्लीम बांधवांनीही सप्ताहाच्या पाचव्या दिवशी भक्तांना महाप्रसाद वाढण्याचे काम करून सेवा करण्याचे पुण्य मिळविले आहे त्याप्रमाणे मलाही आज महाप्रसाद तयार करण्यासाठी सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे परमभाग्य असल्याचे सौ. चैताली काळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संपूर्ण स्वयंपाक गृहामध्ये सेवा करीत असलेल्या महिला भगिनींशी हितगुज साधले. रोटरी क्लब च्या वतीने पुरविण्यात येत असलेल्या मोफत वैद्यकीय सेवेची माहिती घेतली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, नगरसेवक अभयराजे शेळके, जगन्नाथ गोंदकर, विजय जगताप, सुधाकर शिंदे, गोपीनाथ गोंदकर, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष तुकाराम गोंदकर, कमलाकर कोते, संदीप पारख, शिवाजीराजे गोंदकर, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, महाप्रसाद स्वयंपाक गृहाचे प्रमुख आचारी सुरेश टेके आदी उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram