सैनिकांच्या त्यागाची जाणीव ठेवा – सौ. पुष्पाताई काळे

सैनिक देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करतात. कोणतेही सण, उत्सव असो सैनिकांना सर्व सामान्य नागरिकांप्रमाणे आपल्या कुटुंबासोबत हे सण, उत्सव साजरे करता येत नाही. सैनिक घेत असलेले कष्ट व त्याग खूप मोठा आहे. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता देशसेवेचे व्रत हाती घेतलेल्या सैनिकांच्या त्यागाची जाणीव प्रत्येक देशवासीयांनी ठेवावी असे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले. गौतमनगर येथील राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरामध्ये भावाबहिणीच्या प्रेमाचे अतूट बंधन असणा-या रक्षाबंधन सणानिमित्त देशाच्या सीमेवर तैनात असणा-या सैनिकांना राख्या पाठविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी देशसेवेत असणा-या व देशसेवेतून निवृत्त झालेल्या सैनिकांना विद्यालयातील विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. यावेळी बोलतांना त्या पुढे म्हणाल्या की, मिलिट्री व पोलीस विभागात सेवा करणारे सैनिक व पोलीस कर्मचारी यांच्याविषयी मला खूप जिव्हाळा आहे. या विभागात काम करणे खूप मोठे आव्हान असते.आपलीही इच्छा देशसेवा करण्याची होती. देशसेवेत असणारे खूप भाग्यवान असतात. देशसेवा करण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे व व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला. यावेळी सुटीवर आलेले सैनिक विश्वनाथ वाबळे, कु. अदिती कदम, कु. वैशाली शेळके निवृत्त सैनिक ज्ञानेश्वर काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संभाजीराव काळे, कचरू कोळपे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, शहाजापुरचे उपसरपंच बाळासाहेब ढोमसे, प्राचार्य सुखदेव काळे, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे आदी मान्यवरांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रभारी प्राचार्य साहेबराव गायकवाड यांनी केले.सूत्रसंचालन अरुण रुपवते यांनी केले तर आभार पर्यवेक्षक रामकृष्ण दिघे यांनी मानले यावेळी आजी माजी सैनिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram