पालखेड कालव्याचे पाणी बंधाऱ्यांना सोडा - आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यातील पावसाची सरासरी घटल्यामुळे पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न भर पावसाळ्यातही बिकट होत चालला आहे. अशा परिस्थितीत या गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पूर्व भागातील कोळ नदीवरील बंधारे आणि पाझर तलाव पालखेड कालव्याद्वारे पाण्याने भरून द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.मागील काही दिवसांपासून पावसाने तालुक्यात उघड दिली असून पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे तालुक्यातील पूर्व भागात नागरिकांच्या पिण्याच्या तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे. पालखेड कालव्याचे पाणी जर कोळ नदीला सोडले गेले तर कोळ नदीचे बंधारे व पाझर तलाव भरल्यास पूर्व भागातील शिरसगाव, सावळगाव, तीळवणी, आपेगाव, उककडगाव, कासली, पढेगाव, ओगदी, करंजी, अंचलगाव आदी गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. यासंदर्भात सदर गावांमधील ग्रामस्थांनी आशुतोष काळे यांना भेटून निवेदन दिले होते.सदर निवेदनाची त्वरित दखल घेऊन युवानेते आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram