आईचे दूध बाळासाठी अमृत – सौ. चैतालीताई काळे | देर्डे को-हाळे येथे स्तनपान सप्ताह साजरा

आपण सर्व महिला म्हणून जन्माला आलो ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे.कारण फक्त महिलाच एक मुलगी, एक बहीण व एक माता होऊ शकते. त्याचबरोबर प्रत्येक महिलेने आपण आपले कर्तव्यही विसरता कामा नये. प्रत्येक गरोदर मातांनी सर्व प्रकारचा पोषक आहार घेतला पाहिजे. त्याच प्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शिअम, आयर्न व फॉलिक ऍसिड च्या गोळ्या वेळेवर घेतल्या पाहिजे. व आपल्या होणा-या बाळाला नियमितपणे स्तनपान हे दिलेच पाहिजे कारण आईचे दूध बाळासाठी अमृत असते असा मौलिक सल्ला जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी उपस्थित महिलांना दिला. एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत सौ. चैतालीताई काळे यांचे प्रमुख उपस्थितीत स्तनपान सप्ताह व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे येथे आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसया होन होत्या. यावेळी सौ. चैतालीताई काळे यांनी उपस्थित महिलांना गरोदरपणात आरोग्याची घ्यावयाची काळजी, बाळाची काळजी, बाळाला दिले जाणारे विविध आजारावरील डोस, पोषण आहार संदर्भात सखोल मार्गदर्शन करून स्तनपानाचे महत्त्व महिलांना समजावून सांगितले. यावेळी सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते गरोदर महिलांचा ओटीभरण कार्यक्रम पार पडला व त्यांनी लहान मुलांना आहार भरविला. महिलांची रक्त तपासणी करण्यात आली. यावेळी याप्रसंगी जी.प. सदस्या सोनालीताई रोहमारे, सहाय्यक बालविकास अधिकारी के.पी.वराडे, पर्यवेक्षिका आढाव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, पोहेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन बडदे, राहुल रोहमारे, सुधाकरराव होन, सरपंच योगीराज देशमुख, उपसरपंच कृष्णा शिलेदार, देर्डे चांदवडच्या सरपंच सौ. संगीताताई बर्डे, सोपानराव आभाळे, ज्ञानदेव शिंदे, काशिनाथ डुबे,शामराव शिलेदार, दत्तात्रय डुबे, राहुल डुबे, संदीप कोल्हे, प्रकाश देशमुख, आदी मान्यवरांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका सौ. संगीता डुबे, सौ. अनिता शेख, सौ. देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram