वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ हा विचार अंगिकारा - सौ. पुष्पाताई काळे

मागील काही वर्षापासून आपल्या देशात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली पण त्या प्रमाणात नवीन वृक्ष लागवड झालेली नाही. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्याचा परिणाम पर्जन्यमानावर होऊन पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल सावरण्या साठी वृक्ष लागवड मोहीम ही राबविण्यात येत आहे. परंतु फक्त वृक्ष लावून पर्यावरणाचा समतोल सावरला जाणार नाही ज्यावेळी आपण या वृक्षांचे व्यवस्थित संगोपन करू शकलो त्यावेळी ख-या अर्थाने पर्यावरणाचा समतोल सावरला जाईल त्यासाठी प्रत्येकाने `वृक्ष लावा वृक्ष जगवा’ हा विचार अंगिकारला पाहिजे असे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील मढी खु.येथे केले. जागतिक कृषी दिनानिमित मढी खु. ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी मढी विकास सोसायटीच्या चेअरमन सौ. सुनिता पवार होत्या. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सभापती सौ. अनुसया होन, जी.प. सदस्या सौ. सोनाली रोहमारे, एच. डी. एफ. सी. प्रकल्प समन्वयक सौ. रेखा चिकणे, सौ. सुजाता कु-हाडे, ग्रामपंचायत सदस्य वसंतराव आभाळे,नानासाहेब आभाळे, सौ. हिराबाई गवळी, सौ. सोनाली गवळी, सौ. ज्योती भागवत, ग्रामविकास अधिकारी श्रीमती नजन, सौ. ज्योती आभाळे, सौ. लता आभाळे, सौ. उषा आभाळे, सौ. अंजू आभाळे, सौ.वैशाली आभाळे, सौ. चैताली आभाळे, सौ. शांताबाई आभाळे, सौ. मीराबाई काळे, सौ. लावंतिका आभाळे, सौ. लीलाबाई पवार, सौ.लक्ष्मीबाई भागवत, सौ. कमळाबाई माळी, सौ. अलका मोरे,सौ. वैशाली भागवत, सौ. मनीषा गोर्डे, सौ. कुसुम बर्डे, सौ. अलका माळी, सौ. अनिता गांगुर्डे, सौ. मनीषा बर्डे, सौ. उषा माळी, आदी मान्यवरांसह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सौ. वैशाली आभाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद आभाळे यांनी केले तर उपसरपंच अमोल गवळी यांनी आभार मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram