मोफत उपचार शिबिर काळाची गरज - सौ. पुष्पाताई काळे

धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात प्रत्येकाचे आपल्या आरोग्याकडे साफ दुर्लक्ष होते. त्यामुळे शरीराला अनेक व्याधी जडल्या जातात. जर या शारीरिक व्याधींचे वेळेवर निदान व उपचार केले नाही तर सर्वसामान्य नागरिकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागते वेळप्रसंगी आरोग्याकडे केलेले हे दुर्लक्ष जीवावरही बेतू शकते. आजही समाजातील कित्येक नागरिक आर्थिक अडचणीमुळे उपचार घेवू शकत नाही. अशा नागरिकांसाठी मोफत उपचार शिबिर आयोजित केले असून मोफत उपचार शिबिर हे काळाची गरज बनले आहे असे प्रतिपादन प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी कोपरगाव येथे मोफत उपचार शिबीराचे उदघाटन प्रसंगी केले.याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक ३०/६/२०१८ रोजी कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ, प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी यांचे संयुक्त विद्यमाने व राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टी, कोपरगाव तालुका डॉक्टर राष्ट्रवादी सेल यांच्या संकल्पनेतून मोफत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सौ. पुष्पाताई काळे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, आर्थिक चणचण असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ति आपल्या शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करते त्यामुळे भविष्यात आजार बळावतात. ज्यावेळी उपचार घेण्याची वेळ येते त्यावेळी भरमसाठ खर्च येतो. काही वेळेस तर आपल्या आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष वेळप्रसंगी जीवावरही बेतू शकते. हे सर्व टाळण्यासाठी मोफत उपचार शिबिराचे आयोजन केले असून समाजाच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्ति निरोगी राहावी एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून भविष्यात विविध व्याधींवर मोफत उपचार शिबिर राबविण्याचा आपला मानस असल्याचे सौ. पुष्पाताई काळे यांनी यावेळी सांगितले. या मोफत उपचार एकून ७१० रुग्णांची विविध आजारांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले. याप्रसंगी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मेडिसिन तज्ञ डॉ. अभिमन्यू कडू, नेत्ररोग तज्ञ डॉ. पंकज बडोले, दंतरोग तज्ञ डॉ. पूर्णिमा झगडे, समाजसेवक भरत वर्पे, प्रवरा हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी घुले व त्यांचे सहकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विधाटे तसेच पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसयाताई होन, उपसभापति अनिल कदम, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले, तालुका महिला अध्यक्ष सौ. चित्राताई बर्डे, शहराध्यक्षा नगरसेविका सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ. माधवीताई वाकचौरे, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे,अजीज शेख, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सदस्या सौ. विमलताई आगवन, सौ. सोनाली रोहमारे, सौ. सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य अर्जुनराव काळे, मधुकर टेके,श्रावण आसने, सौ. पूर्णिमा जगधने, जिनिग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, रोहिदास होन आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram