शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक मतदार संघातून आघाडीच्या संदीप बेडसे यांना निवडून द्या - आशुतोष काळे

काही चुकीच्या धोरणामुळे आज प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ति असंतुष्ट आहे. शेतक-यांच्या समस्या आहे सरकारी कर्मचा-यांच्या समस्या आहेत. त्याचबरोबर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून या देशाची उज्वल पिढी घडविणा-या शिक्षकांचे सुद्धा अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांना वाचा फोडून शिक्षक बंधू-भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, भाकप, मित्र पक्ष आघाडी व शिक्षक भारती पुरस्कृत टीडीएफ चे उमेदवार संदीप त्र्यंबकराव बेडसे यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्या असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०१८ साठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, भाकप, मित्र पक्ष आघाडी व शिक्षक भारती पुरस्कृत टीडीएफ चे अधिकृत उमेदवार श्री. संदीप त्र्यंबकराव बेडसे यांच्या प्रचारार्थ महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आज ही शिक्षकांच्या समस्या जैसे थे आहे. शिक्षकांच्या खांद्यावर शाळा बाह्य कामे सोपविण्यात येतात. कित्येक शाळेतील शिक्षक सुविधेपासून वंचित आहे. अशा अनेक समस्यांचे कायमचे निराकरण करायचे असल्यास आपल्या मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार संदीप त्र्यंबकराव बेडसे यांना मोठ्या फरकाने निवडून द्या शिक्षकांचे प्रश्न कायमचे सुटतील असा विश्वास युवा नेते आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मा. अरुण कडू, नितीन बेडसे, जनरल बॉडी सदस्य पद्माकांत कुदळे, कारभारी आगवन, बाळासाहेब कदम, एम.टी. रोहमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, विजयराव आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगावचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, अरुणराव चन्द्रे, वडांगळे सर, हिरामण गंगूले तसेच कोपरगाव, राहाता तालुक्यातील मुख्याध्यापक, रयत सेवक या प्रचार सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram