सहकारी संस्था भरभराटी मध्ये कर्मवीर काळे साहेबांचे मोठे योगदान – सौ. चैतालीताई काळे

समाजाकडून आपण जे घेतो ते या समाजाला परत केले पाहिजे अशा उदात्त विचारातून माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सहकारी संस्था स्थापन करून प्राणपनाणे जोपासल्या त्यामुळे या सहकारी संस्था आज प्रगतीपथावर आहेत. या सहकारी संस्था भरभराटी मध्ये कर्मवीर काळे साहेबांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे केले. पोहेगाव येथील श्रीकृष्ण विविध सहकारी सेवा सोसायटीचा सभासद पातळीवर ३०/६/२०१७ अखेर १०० टक्के वसूल झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने या संस्थेस संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते लॅपटॉप सप्रेम भेट देण्यात आला याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी गोरक्षनाथ रोहमारे होते. पुढे बोलतांना सौ. चैतालीताई काळे म्हणाल्या की, आज सर्वच व्यवहार ओंनलाईन पद्धतीने सुरु आहे. सहकारी संस्थांच्या सभासद शेतक-यांचे व्यवहार लॅपटॉपमुळे तातडीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे. सर्वच संस्थाना या माध्यमातून सभासद पातळीवर १०० टक्के वसूल करण्यास निश्चीतपणे प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या भरती परीक्षेसाठी कोपरगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी चांगला अभ्यास करून उत्तीर्ण व्हावे जेणेकरून तालुक्यातील तरुणपिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. कोपरगाव तालुक्यातील सुशिक्षित युवा पिढीला जिल्हा सहकारी बंकेत नौकरीच्या संधी उपलब्ध झाल्यास आपणास विशेष आनंद होईल असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. यावेळी जिल्हा बँक तालुका विकास अधिकारी कैलास गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सौ. चैतालीताई काळे यांचे कामकाजात अनमोल मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. टी. रोहमारे यांनी केले.तर सूत्रसंचालन अशोक घेर यांनी केले. याप्रसंगी विठ्ठलराव औताडे, रावसाहेब औताडे, अतुल औताडे, ज्ञानदेव औताडे, देवेन रोहमारे, रामनाथ घोटेकर, विठ्ठल जावळे, सुनील गवळी, सुधीर थोरात, जवळकेचे पोलीस पाटील थोरात, अशोक घेर, बाळासाहेब खांडगे, शिंदे, चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram