कन्यारत्न चित्रपटातून समाज मतपरिवर्तन स्त्रीभ्रॄण हत्या थांबण्यास मदत - सौ. पुष्पाताई काळे

पुरोगामी महाराष्ट्र अशी बिरुदावली मिरवणारे आपले राज्य, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचा वारसा सांगणा-या आपल्या महाराष्ट्र राज्यापुढे स्त्री भ्रुणहत्या हा चिंतेचा विषय आहे. स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी समाजात अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा असूनही स्त्री भ्रुण हत्या सुरूच आहे. वंशाला दिवा हवा या हट्टापायी गर्भलिंग निदान करून जन्माआधीच हत्या केली जात आहे. मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही वंशाची पणती असते हे समाजाने विसरता कामा नये. जोपर्यंत मुलगी नको फक्त मुलगाच हवा ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हा प्रकार थांबणं शक्य नाही हे वास्तव आहे परंतु कन्यारत्न चित्रपटाच्या आशयातून समाजाचे मतपरिवर्तन होऊन स्त्रीभ्रॄण हत्या थांबण्यास नक्कीच मदत होईल असा आशावाद प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी कोपरगाव येथे व्यक्त केला. सोनई फिल्म क्रिएशन निर्मित दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या कन्यारत्न या मराठी चित्रपटाचा संगीत प्रदर्शन सोहळा नुकताच सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथे संपन्न झाला याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी कन्यारत्न चित्रपट लेखक व निर्माते डी. गोवर्धन, सभापती सौ.अनुसया होन, सौ. उमा वहाडणे, नगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. वर्षाताई गंगुले, सौ. नेत्रा कुलकर्णी, सौ. संगीता विसपुते, सौ. मनीषा विसपुते, सौ. अश्विनी देशपांडे, सौ. मनजितकौर जगतार शेखो, सौ. नेहा पटेल, सौ. भवानी पटेल, सौ. नेहा कराचीवाला, सौ. मीना गुरळी, सौ. लतिका गायकवाड, रोहिदास होन, प्रसाद साबळे, डॉ. आव्हाड, निलेश उदावंत, काळे कारखान्याचे संचालक अरुण चंद्रे ,निवृत्ती शिंदे, मुकुंद इंगळे, रविंद्र चिंचपूरे, रावसाहेब साठे, राजन त्रिभुवन, राजेंद्र खैरनार, मतीयाज शेख, लक्ष्मण सताळे , गोपिशेठ चव्हाण, बाळासाहेब रुईकर, दिग्दर्शक, अभिनेते शिवाजी दोलताडे, कलाकार रोहन पाटील, विकास वरे, कार्तिक दोलताडे, ऋतुजा वावरे, रोहिणी मानकर, बालकलाकार ईश्वरी मानकर, अनंत थोरात, गीतकार वामन घोलप, , आदी मान्यवरांसह मराठी चित्रपट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विमल राठी यांनी केले तर आभार सौ. प्रतिभा शिलेदार यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram