साखर उद्योगाला स्थैर्य मिळण्यासाठी प्रभावी धोरण राबविण्याची गरज – आशुतोष काळे

देशात व जगात चालू वर्षी साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे पुढील हंगामातही ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे साखरेचे उत्पादन वाढणार असल्यामुळे साखरेच्या दरात वाढ होईल याची शाश्वती खूप कमी आहे. अन्न व पुरवठा विभागाने जरी २०.०० लाख मे. टन साखर निर्यात करण्याचे जाहीर केल असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दराचा विचार केल्यास साखर निर्यात होऊ शकणार नाही. याचे उदाहरण म्हणजे पाकिस्तान सरकारने अनुदान देवूनही साखर निर्यात होऊ शकली नाही. गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी ३५००/- ते ३६००/- रुपये असलेला साखरेचा दर हा २५५०/- रुपयांपर्यंत खाली आला होता. जवळपास ९५०/- रुपयांनी दर घसरल्यामुळे शेतक-यांना एफ. आर. पी. प्रमाणे दर देणेही अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे साखर उद्योगापुढे मोठ्या अडचणी वाढल्या आहे. साखर उद्योगाला या अडचणीतून बाहे काढण्याठी व साखर उद्योगाला स्थैर्य मिळण्यासाठी प्रभावी धोरण राबविण्याची गरज असल्याचे मत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कारखान्याच्या २०१७/१८ च्या ६३ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी जेष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे होते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०१७ /१८ च्या ६३ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ कार्यक्रम नुकताच कारखान्याचे संचालक मीननाथ रखमा बारगळ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सीताबाई मीननाथ बारगळ या दाम्पत्यांच्या शुभ हस्ते विधिवत सत्यनारायणाची पूजा करून संपन्न झाला. यावेळी बोलतांना युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की, गाळप हंगामाचा शुभारंभ करतांना शेतकी विभागाने ५.५० लाख मे. टन गाळप होईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु ६.०० लाख मे. टन ऊसाचे गाळप करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान केले होते. त्या आव्हानाचा सर्वच घटकांनी योय योगदान देवून २०१७/१८ या गळीत हंगामात ६,३१,६६८ लाख मे. टन ऊसाचे गाळप झाले आहे. कार्यक्षेत्रातून ३,९५,९२३ लाख मे. टन व कार्यक्षेत्राबाहेरून २,३५,७४४ लाख ऊस गाळप करण्यात आला असून ६,५९,३०० क्विंटल साखर उत्पादन होऊन सरासरी १०. ४३ साखर उतारा मिळाला आहे. ऊस उत्पादकांना योग्य तो न्याय देण्याची परंपरा व आदर्श माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांनी घालून दिला ऊस उत्पादक शेतक-यांना साखरेचे दर घसरले असतांनाही गळीत हंगामाच्या सुरुवातीला जो दर दिला तोच दर गळीत हंगामाच्या शेवटच्या ऊसाला दिल्याचे नमूद केले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सूर्यभान कोळपे, सर्व संचालक मंडळ, संलग्न संस्थांचे सर्व चेअरमन, पदाधिकारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. जे. जगताप, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जे. ए. भिडे, कारखान्याचे जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, सेक्रेटरी एस. एस. कोल्हे, ऑफिस सुपरिटेडेट बी. बी. सय्यद, चिफ इंजिनियर डी. बी. चव्हाण, शेतकी अधिकारी के. व्ही. कापसे, चिफ केमिस्ट एस. जे. ताकवणे, इतर पदाधिका-यांसह सभासद, शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी एस. एस. कोल्हेयांनी केले तर आभार संचालक अरुण चंद्रे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram