लोकप्रतिनिधींकडून आवर्तनाची फक्त जाहिरातबाजी | तातडीने चा-या सोडण्यासाठी प्रयत्न करणार – आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधी ज्या ज्यावेळी आवर्तनाची घोषणा होते त्यावेळी मोठ्या प्रमाणात आवर्तनाची जाहिरातबाजी करतात परंतु सोडण्यात आलेले आवर्तन पूर्ण करून घेण्यात तालुक्याच्या लोकप्रतिनिधी मात्र सपशेल अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे पाण्याआभावी पिके वाळून चालली असून तातडीने चा-या सोडण्यासाठी आपण जातीने प्रयत्न करू असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे केले. सोनेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या १९ लाख रुपये खर्चाच्या नगदवाडी ते आनंदवाडी रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ व ३६ लाख रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी आशुतोष काळे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर काळे कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन काकासाहेब जावळे होते. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, पाटपाण्याचे आवर्तन पूर्ण करून घेण्याची जबाबदारी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींची आहे. अधिका-यांना जाब विचारण्याची जबाबदारी सुद्धा त्यांची आहे. एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. आवर्तन सुटून एवढे दिवस झालेत तरी चा-या सुटलेल्या नाहीत. उन्हाची तीव्रता वाढली आहे. शेतक-यांच्या फळबागा, चारा पिके, पाण्याआभावी जळून चालली आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या अडचणीत भर टाकण्याचे काम तालुक्याच्या लोकप्रतिनिधी करीत असल्याचा आरोप यावेळी आशुतोष काळे यांनी तालुक्याच्या लोकप्रतिनिधी सौ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता केला. ग्रामीण भागात आजही विकास कामांचा अनुशेष मोठा असून सर्व ग्रामपंचायतीने विकास कामांचे प्रस्ताव पाठवावे. त्या प्रस्तावांचा जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर पाठपुरावा करून ग्रामीण भागाचा कायापालट करू असा विश्वास उपस्थितांना दिला. या प्रसंगी सोनेवाडी मध्ये पूर्ण झालेली विकास कामे यामध्ये गव्हाणे वस्ती ते बोंडखळ वस्ती डांबरीकरण (खर्च १३ लाख), जायपत्रे वस्ती जिल्हा परिषद शाळा वॉलकंपाऊंड (खर्च ३ लाख), सोनेवाडी जिल्हा परिषद शाळा वॉलकंपाऊंड (खर्च ३ लाख), बिरोबा वस्ती अंगणवाडी वॉलकंपाऊंड (खर्च ३ लाख), दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत मुख्य रस्ता ते हायस्कूल रस्ता (खर्च ७.५ लाख), ढवळे वस्ती ते गांगुर्डे वस्ती रस्ता काँक्रीटिकरण (खर्च २.८५ लाख), गोकुळ बाबा हातपंप ते हायस्कूल रस्ता काँक्रीटिकरण (खर्च ३ लाख), पायका अंतर्गत हायस्कूल व्हॉलिबॉल मैदान, (खर्च १ लाख), दलित वस्ती समाज मंदिर काँक्रीटिकरण व व्यायाम शाळा आदी पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रमासाठी सभापती सौ. अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली रोहमारे, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, एम टी. रोहमारे, सोनेवाडीचे सरपंच गंगाधर खोमणे, उपसरपंच विजय जगताप, शरद पवार पतसंस्थेचे उपाध्यक्ष सोपानराव गुडघे, राहुल रोहमारे, रोहीदास होन, पाराजी होन, केशव जावळे, शंकर चव्हाण, विठ्ठल जावळे, शिवाजी जावळे, कर्णा जाधव, हरिभाऊ जावळे, सुरेश साबळे, नवनाथ माळी, ग्रामविकास अधिकारी जोर्वेकर, कचरू डुबे, किशोर जावळे, आदी मान्यवरांसह सोनेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केशव जावळे यांनी केले तर आभार किसन जावळे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram