लिंगायत समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी बांधील -आशुतोष काळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आजवर प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. लिंगायत समाजाला आरक्षण मिळाल्यास बेरोजगार तरुणांना विशेष अर्थसहाय्य मिळू शकते.अल्पसंख्याक मंत्रालयामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभही लिंगायत समाजाला मिळून या बांधवांचा उत्कर्ष होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी लिंगायत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. लिंगायत समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव बांधील असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे केले. कोपरगाव तहसील कार्यालयात जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोपरगाव तहसील कार्यालय व शहरात विविध ठिकाणी श्री भगवान परशुराम महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमांचे पूजनही युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार किशोर कदम, लिंगायत संघर्ष समिती समन्वयक ओमप्रकाश कोयटे, दीपक नीळकंठ, श्रीकांत कोयटे, अमोल साखरे, संदीप कोयटे, दीपक हिंगमिरे, विजयराव आढाव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनिल शिलेदार, रमेश गवळी, फकीरमामु कुरेशी, कुष्णा आढाव, अजिज शेख, दीनकर खरे, राहुल देवळालीकर, निखील डांगे, संदीप सावतडकर, विशाल निकम, विक्की जोशी आदी मान्यवरांसह लिंगायत समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram