मुलींना आरोग्य, कायदा व व्यावसायिक मार्गदर्शन मिळाले पाहिजे - सौ. चैतालीताई काळे

समाजात महिलांना सर्वात जास्त समस्यांना सामोरे जावे लागते. आजच्या मुली या उद्याचा समाज घडविणार आहेत. त्यासाठी मुलींना आरोग्य, कायदा व व्यावसायिक मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे केले. पंचायत समिती कोपरगाव यांचे वतीने एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी सौ. चैतालीताई काळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ. अनुसया होन होत्या. सौ. चैतालीताई काळे पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, मुलींनी आपले आरोग्य सुदृढ राहावे यासाठी चांगला आहार घेतला पाहिजे. मुलींच्या प्रत्येक पालकांना आपली मुलगी शिकून मोठी व्हावी असे स्वप्न उराशी बाळगलेले असते त्यासाठी त्यांना अपार कष्ट सोसावे लागतात याची जाणीव मनात ठेवून प्रत्येक मुलीने जिद्दीने शिकलं पाहिजे. शिक्षण घेत असतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या फायद्यासाठी करावा असा मौलिक सल्ला सौ. चैतालीताई काळे यांनी उपस्थित असलेल्या मुलींना दिला. यावेळी अॅड. सौ. धोर्डे मॅडम, सोनवणे सर व डॉ. विधाते या मान्यवरांनी कायदा, व्यवसाय व आरोग्य या विषयी बहुमोल मार्गदर्शन केले. सभापती सौ. अनुसयाताई होन, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनालीताई रोहमारे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनालीताई रोहमारे, सुधाकर दंडवते, प. स. सदस्य मधुकर टेके, माजी व्हाईस चेअरमन आनंदराव चव्हाण,दगु होन, रोहिदास होन, अॅड. राहुल रोहमारे, डॉ. खोत, संजय होन, वळवी साहेब, श्रीमती आढाव मॅडम, वराडे मॅडम,रणशूर मॅडम,कानडे मॅडम,ढेपले सर आदी मान्यवरांसह विद्यार्थिनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram