वाचनाने मनुष्याच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते – सौ. चैताली काळे

इंटरनेट, फेसबुक, व्हाटसअॅप मुळे एका क्लिकवर जगात घडणा-या गोष्टीची माहिती मिळू लागल्यामुळे आज वाचनाची गोडी अतिशय कमी झाली आहे. प्रत्येक व्यक्तीकडे असलेले ज्ञान ही त्या व्यक्तीची शक्ती असते. या शक्तीला वाचनाची जोड दिल्यास ज्ञानामध्ये भर पडून त्या व्यक्तीचे भविष्य उज्वल होण्यास मदत होऊन मनुष्याच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले.माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये कर्मवीर वाचनालयाचे उदघाटन व वीरसम्राट प्रतिष्ठानच्या फलकाचे अनावरण सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, वाचाल तर वाचाल' हा विचार आजच्या घडीला किती समर्पक आहे हे याची सर्वांना जाणीव आहे परंतु याकडे कुणीही गांभीर्याने पहायला तयार नाही. आज या ठिकाणी सुरु करण्यात आलेले वाचनालय अतिशय स्तुत्य उप्रकम असून शहरातील प्रत्येक प्रभागात अशा प्रकारचे वाचनालय सुरु झाल्यास विद्यार्थी व वाचनाची आवड असणा-या नागरिकांना याचा फायदा होऊन वाचन संस्कृतीला निश्चितपणे चालना मिळणार आहे. प्रत्येकाने वाचनाचे महत्त्व जपतांना पुस्तकांशी असलेले मैत्रीचे घट्ट नाते अबाधित राखायला हवे तरच वाचन संस्कृतीचा होणारा -हास रोखण्यास निश्चितपणे मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी विरसम्राट प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेंद्र आभाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दीपक साळुंके, विजयराव आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक संदीप पगारे, कृष्णा आढाव, फकीरमामू कुरेशी, चन्द्रशेखर आव्हाड, प्रदीप कु-हाडे, प्रसाद उदावंत, सचिन बडे, किरण पवार, चन्द्रशेखर म्हस्के, स्वप्नील पवार, डॉ. तुषार गलांडे, ऋषिकेश खैरनार, कुलदीप लवांडे, फिरोज पठाण आदी मान्यवरांसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram